Corona Vaccine : कोरोनावरील लस Delta variant वर 8 पट कमी प्रभावी, नव्या स्टडीने चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 07:56 PM2021-07-05T19:56:04+5:302021-07-05T20:19:53+5:30
Corona Vaccine : ही स्टडी दिल्लीतील सर गंगारामसह देशातील अनेक रूग्णालयातील 100 हेल्थ केअर वर्कर्सवर करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) सध्या जागतिक चिंतेचे कारण बनले आहे. एका नवीन स्टडीनुसार असे दिसून आले आहे की, डेल्टा व्हेरिएंटविरोधात सध्याच्या कोरोना लसीद्वारे तयार झालेल्या अँटीबॉडी 8 पट कमी प्रभावी (संवेदनशील) आहेत. तसेच वुहान स्ट्रेनच्या तुलनेत हा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आहे.
ही स्टडी दिल्लीतील सर गंगारामसह देशातील अनेक रूग्णालयातील 100 हेल्थ केअर वर्कर्सवर करण्यात आली आहे. या स्टडीत केंब्रिज विद्यापीठातील वैज्ञानिकही सहभागी झाले होते. लसींवर करण्यात आलेल्या स्टडीनुसार असे दिसून येते की, कोरोना लशीमुळे निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीजचा डेल्टा व्हेरिएंटवर 8 पट कमी परिणाम होतो. तसेच यामुळे श्वसन यंत्रणेत अधिक गंभीर संक्रमणही होते. याव्यतिरिक्त, त्याची संसर्गजन्य क्षमता देखील खूप जास्त आहे.
युरोपियन एजन्सीचा इशारा
गेल्या काही दिवसांपूर्वी युरोपीयन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोलने (ECDC) देखील म्हटले आहे की, या उन्हाळ्यात डेल्टा व्हेरिएंटचा जास्त प्रादुर्भाव होईल. विशेषत: अशा तरुणांमध्ये ज्यांना अद्याप लस मिळाली नाही. नवीन डेल्टा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आहे. ऑगस्टच्या अखेरपर्यंत युरोपमधील 90 टक्के प्रकरणे या व्हेरिएंटशी संबंधित असतील, असा अंदाज आहे. डेल्टा व्हेरिएंट आपल्या आधीच्या अल्फा व्हेरियंटपेक्षा 40-60 पट जास्त संक्रामक असू शकतो, असाही अंदाज एजन्सीने व्यक्त केला आहे.
अनेक देशात डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग
पब्लिक हेल्थ इंग्लंडने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात एकूण नवीन प्रकरणांपैकी 96 टक्के प्रकरणे डेल्टा व्हेरिएंटची आहेत. जर्मनीमध्येही डेल्टा व्हेरिएंटमुळे नवीन कोरोना प्रकरणांची संख्या दुप्पट झाली आहे. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनीही युरोपला डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग पाहता सावध राहण्याचा इशारा दिला. डेल्टा व्हेरिएंटमुळे रशिया देखील वाढलेल्या कोरोना प्रकरणांशी झुंज देत आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे इस्त्राईल आणि ऑस्ट्रेलियामध्येही प्रकरणे वाढत आहेत.
चिंता वाढली! पुढील महिन्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, मुलांवर अधिक परिणाम : #SBI Report https://t.co/mGl6DiDh1I#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) July 5, 2021
पुढील महिन्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट : SBI Report
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतात कोरोनाची तिसरी लाट पुढील महिन्यात येऊ शकते. याचबरोबर, या रिपोर्टमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत ही लाट शिगेला पोहोचण्याचा दावा करण्यात आला आहे. या तिसऱ्या लाटेचा परिणाम मुलांवर अधिक दिसून येऊ शकतो. तसेच, यादरम्यान, सर्व लोकांचे प्राधान्य कोरोनावरील लस असले पाहिजे. देशात 12-18 वर्ष वयोगटातील 15-17 कोटी मुले आहेत. विकसित देशांप्रमाणेच या वयोगटातील लसी विकत घेण्यासाठी भारतानेही आगाऊ धोरण आखले पाहिजे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.