Corona Vaccine: वेगवेगळ्या लसीचे दोन डोस चालतात? संशोधन काय म्हणते? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 06:02 AM2021-05-23T06:02:37+5:302021-05-23T06:03:41+5:30
Corona Vaccine Update: आता दोन लसींचे डोस एकत्र करण्याचा नवा फॉर्म्युला पुढे आला आहे. तो सध्या शक्य आहे का? जाणून घ्या...
कोरोनाचा वाढता प्रभाव आटोक्यात आणण्याचा केंद्र आणि राज्य सरकारे आटोकाट प्रयत्न करत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्नही होत आहे. मात्र, त्यास म्हणावे तसे यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आता दोन लसींचे डोस एकत्र करण्याचा नवा फॉर्म्युला पुढे आला आहे. तो सध्या शक्य आहे का? जाणून घ्या... (Do two doses of different vaccines work? What does the research say?)
शास्त्रीयदृष्ट्या शक्य..
एखाद्याला एका लसीचा एक डोस दिला आणि दुसरा डोस अन्य लसीचा दिला तर ते शास्त्रीयदृष्ट्या शक्य आहे.
मात्र, अशा प्रकारची शिफारस करायची किंवा कसे यासंदर्भातील निर्णय घेण्यास वेळ लागेल, असे निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले.
ब्रिटनमध्ये असा प्रयोग अलीकडेच करण्यात आला परंतु असे केल्याने अनेक दुष्परिणाम संभवतात, असे त्यांचा अभ्यास अहवाल सांगतो.
डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले...
दोन लसींचे डोस एकत्र करणे शक्य आहे; परंतु त्यासाठी सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.
अद्याप तरी यासंदर्भातील कोणतेही ठोस शास्त्रीय पुरावे उपलब्ध नाहीत.
आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनावर हे अवलंबून असेल.
एका लसीचा एक डोस अँटिबॉडीज तयार करतो तर दुसऱ्या लसीचा
दुसरा डोस त्यांची संख्या वाढवतो, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन
सद्य:स्थितीत भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचे डोस मोठ्या प्रमाणात दिले जात आहेत.
दोन्ही लसींचा दुसरा डोस हा बूस्टर डोस असल्याचे समजले जाते.
त्यातच आरोग्य मंत्रालयाने आधी ज्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. तिचाच दुसरा डोस घ्यावा, असे वारंवार स्पष्ट केले आहे.
अभ्यासात काय आढळले?
अलीकडेच दोन लसींचे डोस एकत्र करून त्याचा काय परिणाम होतो यावर अभ्यास करण्यात आला.
२००० स्वयंसेवकांना ऑक्सफर्ड आणि फायझर यांचा आणि मॉडर्ना व नोवाव्हॅक्स या लसींचे मिश्रण देण्यात आले.
मात्र, एकत्रित डोस दिल्याने कोरोनापासून संबंधितांचे रक्षण होते किंवा कसे हे अभ्यासाचे उद्दिष्ट नव्हते.
संबंधितांच्या प्रतिकारशक्तीची चाचणी घेण्यात आली. त्यांच्यात अल्पकाळासाठी दु्ष्परिणाम जाणवले.