Corona vaccine : कोरोनाविरोधातील लढाईला अजून बळ मिळणार, सिरम १५ मेपासून Covovax ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 09:09 PM2021-05-04T21:09:15+5:302021-05-04T21:09:59+5:30

Corona vaccine Update : सीरम इन्स्टिट्युट कोवोव्हॅक्सच्या (Covovax ) तिसऱ्या टप्प्याची चाचणी ही आयसीएमआरसोबत मिळून घेणार आहे.

Corona vaccine: The fight against corona will get stronger, Serum will test Covovax in the third phase from May 15 | Corona vaccine : कोरोनाविरोधातील लढाईला अजून बळ मिळणार, सिरम १५ मेपासून Covovax ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करणार

Corona vaccine : कोरोनाविरोधातील लढाईला अजून बळ मिळणार, सिरम १५ मेपासून Covovax ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करणार

Next

पुणे - कोरोनाविरोधातील लसीचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने कोरोनाविरोधातील लढाईत अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. १५ मेपासून सिरम इन्स्टिट्युटमध्ये कोवोव्हॉक्स या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्युट कोवोव्हॅक्सच्या (Covovax ) तिसऱ्या टप्प्याची चाचणी ही आयसीएमआरसोबत मिळून घेणार आहे. (The fight against corona will get stronger, Serum will test Covovax in the third phase from May 15)

आयसीएमआर-नॅशनल एड्स रिसर्ज इंस्टिट्युटशी संबंधित असलेले डॉ. अभिजित कदम यांनी सांगितले की, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी देशभरात १९ साईट्स आहेत, त्यामधील चार साईट्स पुण्यामध्ये आहेत. या साईट्सवर व्हॉलेंटियर्स आणण्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सीरम इन्स्टिट्युटने कोरोनापासून बचावासाठी कोवोव्हॅक्स लस विकसित करण्यासाठी अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्ससोबत करार केलेला आहे. 

दरम्यान, ही कोवोव्हॅक्स लस सप्टेंबरपर्यंत बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे. सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी भारतामध्ये ही लस सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होण्याचे संकेत दिले होते. मिळत असलेल्या माहितीनुसार कोवोव्हॅक्स ही कोरोनाच्या दक्षिण आफ्रिकी आणि ब्रिटिश व्हेरिएंटवरही प्रभावी आहे. दरम्यान, सीरममध्ये उत्पादित होत असलेली कोविशिल्ड ही लस आधीपासूनच लसीकरणासाठी वापरली जात आहे. 

नोवाव्हॅक्सने सीरम इन्स्टिट्युटला कोरोनाविरोधातील २ बिलियन लसीच्या डोससाठी करार केला आहे. भारतामध्ये ही लस कोवोव्हॅक्स या नावाने विक्रीला उपलब्ध असेल.  

Web Title: Corona vaccine: The fight against corona will get stronger, Serum will test Covovax in the third phase from May 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.