Corona Vaccine : बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर चक्कर आली अन् गमावला जीव; कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 12:59 PM2021-09-20T12:59:31+5:302021-09-20T13:05:36+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लस घेतल्यानंतर एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,256 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 295 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,45,133 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णांचा आकडा 33,478,419 वर पोहोचला आहे. याच दरम्यान लसीकरणासंदर्भात काही घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील नूंह खंड गावात कोरोना लस घेतल्यानंतर एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण अभियान सुरू करण्यात आलं होतं. याच दरम्यान गावातील 52 वर्षीय लल्लू यांनी लस घेतली. लस घेतल्यानंतर ते काही वेळ लसीकरण केंद्रावर बसले होते. मात्र त्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. चक्कर आली आणि ते खाली पडले. तेथे उपस्थित असलेल्या लोकांना डॉक्टरांना याबाबत तातडीने माहिती दिली. डॉक्टरांना त्यांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान लल्लू यांचा मृत्यू झाला.
Corona Vaccine : धक्कादायक! एक, दोन नव्हे तर तब्बल 5 वेळा लसीचा डोस, भाजपा नेत्याच्या सर्टिफिकेटवरून खळबळ#CoronavirusUpdates#Corona#coronavaccinehttps://t.co/2XEwlxVSvs
— Lokmat (@MiLOKMAT) September 20, 2021
कोरोना लस घेतल्यानंतर प्रकृती बिघडली
लसीकरण अधिकारी डॉ, बसंत दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लल्लू यांना 12 वर्षांपूर्वी पॅरालिसिस झालं होतं. ज्याच्यामुळे त्यांचे हात-पाय अद्यापही काम करत नाहीत. तसेच त्यांना उच्च रक्तदाबाचा देखील त्रास होता. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना दारुचं देखील व्यसन होतं. पण तरी देखील त्यांनी कोरोनाची लस घेतली. त्यांचा मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून त्यातून नेमकं कारण समोर येईल असं देखील म्हटलं आहे. पण कुटुंबीयांनी लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोनाबाबत रिसर्चमधून महत्त्वाचा खुलासा #coronavirushttps://t.co/Tq90arq9QI
— Lokmat (@MiLOKMAT) September 18, 2021
बापरे! भाजपा नेत्याला देण्यात आले कोरोना लसीचे 5 डोस; सहावा डोसही शेड्यूल, हैराण करणारं प्रकरण
भाजपाच्या एका नेत्याला एक दोन नव्हे तर तब्बल 5 वेळा कोरोना डोस देण्यात आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कोरोना लसीचे पाच डोस दिलेले असले तरी आता सहावा डोस शेड्यूल असल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील सरधाना भागात ही हैराण करणारी घटना घडली आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रातून हे समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 73 वर्षीय रामपाल सिंह हे बूथ क्रमांक 79 चे भाजपा अध्यक्ष आहेत आणि हिंदू युवा वाहिनीचे सदस्य आहेत. त्यांनी लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड केल्यावर त्यात त्यांना लसीचे पाच डोस देण्यात आल्याचं लिहिलं आहे. रामपाल सिंह यांनी आरोग्य विभागावर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. त्याच्या तक्रारीनंतर या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; दोन मुलं झाली अनाथ#coronavirus#CoronavirusIndiahttps://t.co/SnTVE3EQOt
— Lokmat (@MiLOKMAT) September 18, 2021