Corona Vaccine: लसीकरणासाठी कशी कराल नोंदणी?; प्रक्रियेविषयी जाणून घ्या सारे काही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 05:49 AM2021-04-28T05:49:57+5:302021-04-28T05:50:15+5:30
आजपासून सुरुवात
कोरोनाप्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्याला १ मेपासून सुरुवात होत आहे. १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना या टप्प्यात लस घेता येणार आहे. लस घेण्यासाठी आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडणार आहेत. नोंदणीची प्रक्रिया आज, २८ एप्रिलपासून सुरू होत आहे. याविषयी जाणून घेऊ या...
असे करा रेजिस्ट्रेशन
आरोग्य सेतू ॲप्लिकेशन
कोविन (cowin.gov.in)
- नोंदणी केल्यावर तुम्हाला ओटीपी येईल. त्यावरून तुमच्या मोबाइल नंबरची पडताळणी होईल
- आधार कार्ड, पॅन कार्ड वा अन्य कोणत्याही फोटो आयडीवरून तुमची माहिती भरावी लागेल
- पिनकोड वगैरे माहिती भरल्यानंतर लसीकरण केंद्र आणि वेळ यांची निवड करावी लागेल
- एका मोबाइल नंबरवरून किमान चार जणांची नोंदणी होऊ शकेल
लसीकरण केंद्रावर जाण्यापूर्वी हे नक्की करा...
- भरपूर नाश्ता करून जा
- तु्म्हाला कोरोना होऊन गेला
- असेल तर बरे झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी तु्म्ही लस घेणे योग्य ठरेल
- ताप आणि खोकला असेल तर लस घेणे टाळा
लस घेतल्यानंतर काय करावे
- लसीकरण केंद्रावर किमान अर्धा तास थांबावे. कधीकधी ॲलर्जी येण्याची शक्यता असते
- लस घेतल्यानंतर ताप येण्याबरोबरच लस ज्या ठिकाणी टोचली आहे तिथे सूज येण्याची शक्यता असते मात्र हा त्रास दोन दिवसच राहील, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही
लसीचा प्रभाव कधी सुरू होतो...
- लसीच्या पहिल्या मात्रेचा कोरोना विषाणूवर प्रभाव पडण्यासाठी थोडा कालावधी जाऊ द्यावा लागतो
- दोन आठवड्यांनी लस प्रभावी ठरू लागते, असा सरकारचा दावा आहे
कोणकोणत्या राज्यांत मिळणार मोफत लस
१८ वर्षांपुढील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा करणाऱ्या राज्यांत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, बिहार, झारखंड, पंजाब, हरियाणा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, गोवा, तामिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ, ओडिशा, गुजरात, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे