खूशखबर! देशात तयार होताहेत 3 कोरोना लशी; एकीचं तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण आज-उद्या सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 07:05 PM2020-08-18T19:05:36+5:302020-08-18T19:35:43+5:30

लस देताना, ज्या लोकांना अद्याप कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, त्यांचा विचार सर्वप्रथम करण्यात येणार आहे. कारण...

Corona vaccine Marathi News three vaccines are in different stages one vaccine will reach phase 3rd trials till today or tomorrow | खूशखबर! देशात तयार होताहेत 3 कोरोना लशी; एकीचं तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण आज-उद्या सुरू होणार

खूशखबर! देशात तयार होताहेत 3 कोरोना लशी; एकीचं तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण आज-उद्या सुरू होणार

googlenewsNext
ठळक मुद्देलस देताना, ज्या लोकांना अद्याप कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, त्यांचा विचार सर्वप्रथम करण्यात येणार आहे.कोरोना संसर्गाचा अधिक धोका असलेल्या वयोगटातील व्यक्तींनाही याच गटात ठेवण्यात आले आहे.इतर 2 लशी परीक्षणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसवरील लशीचे उत्पादन आणि त्याच्याशी संबंधित काही इतर मुद्द्यांवर सोमवारी तज्ज्ञांची बैठक झाली. या बैठकीत ही लस सर्वप्रथम कुणाला दिली जाणार आणि तिचा डोस कशाप्रकारे दिला जाणार, हे सांगण्यात आले.

लस देताना, ज्या लोकांना अद्याप कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, त्यांचा विचार सर्वप्रथम करण्यात येणार आहे. कारण, जे लोक संक्रमित झाले आहेत, त्यांच्या शरिरात कोरोना व्हायरसची अँटीबॉडी तयार होते. यामुळे असे लोक लस देण्याच्या प्राधान्य क्रमात येत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही म्हटले आहे, की  आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना सर्वप्रथम लस दिली जायला हवी.

कोरोना संसर्गाचा अधिक धोका असलेल्या वयोगटातील व्यक्तींनाही याच गटात ठेवण्यात आले आहे. या बैठकीत नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले, लशी वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. यातील एक लस आज किंवा उद्या परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचेल. यासंदर्भात योग्य दिशेने काम होत आहे. लस तयार होताच लशीची सप्लाय चेनदेखील तयार करण्यात येईल. काही लशींसाठी कोल्ड चेन प्रोक्योरमेंटचीही आवश्यकता भासेल. तर काही लशी अशाही असतील, ज्यांचे प्रत्येक व्यक्तीला दोन डोस द्यावे लागतील.

भारतात तीन लशींवर काम होत आहे, यांपैकी एक लस आज अथवा उद्या परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचेल. तर इतर 2 लशी परीक्षणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत. स्वातंत्रदिनाच्या दिवशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला यासंदर्भात माहिती दिली होती, असेही डॉ. व्हीके पॉल यांनी यावेळी सांगितले. 

'3 कोटीहून अधिक टेस्ट' -
आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की "आतापर्यंत देशात एकूण 3 कोटीहून अधिक लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत जवळपास 9 लाख टेस्ट करण्यात आल्या आहेत. मंत्रालयाने सांगितले, की आतापर्यंत जवळपास 19 लाख रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर मृत्यू दर 2 टक्क्यांपेक्षाही कमी आहे."

आरोग्य मंत्रालयाचे राजेश भूषण म्हणाले, "रोज साधारणपणे 55 हजार रुग्ण बरे होत आहेत. दैनंदीन पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांवरून 7.72 टक्क्यांवर आला आहे. आता साप्ताहिक मृत्यू दर 1.94 टक्के आहे. आमचे लक्ष्य मृत्यू दर 1 टक्क्यापेक्षा कमी करणे आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोज जवळपास 2 लाख टेस्ट केल्या जात होत्या, तर आता हा आकडा 8 लाख टेस्टवर पोहोचला आहे."

महत्त्वाच्या बातम्या -

कोरोनाविरोधातील लढाईत आणखी एक पाऊल, याच आठवड्यात तिसऱ्या टप्प्यात पोहोचणार ऑक्सफर्डची लस 

15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

Web Title: Corona vaccine Marathi News three vaccines are in different stages one vaccine will reach phase 3rd trials till today or tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.