Corona vaccine ची गरज भासताच बदलले कॅनडाचे सूर, शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचे केले कौतुक

By बाळकृष्ण परब | Published: February 13, 2021 08:32 AM2021-02-13T08:32:19+5:302021-02-13T08:33:53+5:30

Farmers Protest : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र आता कॅनडाचे सूर बदलले आहेत.

Corona vaccine needs to be changed in Canada, praises central government stand on Farmers Protest | Corona vaccine ची गरज भासताच बदलले कॅनडाचे सूर, शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचे केले कौतुक

Corona vaccine ची गरज भासताच बदलले कॅनडाचे सूर, शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचे केले कौतुक

Next
ठळक मुद्देकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाबाबत भारत सरकारने केलेल्या चर्चेच्या प्रस्तावाचे कौतुक केले आहेकोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर कोरोनावरील लसीची गरज भासल्यावर कॅनडाचे सूर बदलू लागले आहेतकॅनडा सरकार कॅनडामध्ये असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरू झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र भारताने परखड प्रतिक्रिया दिल्यानंतर तसेच कोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर कोरोनावरील लसीची (Corona vaccine) गरज भासल्यावर कॅनडाचे सूर बदलू लागले आहेत. भारताच्या व्हॅक्सिन डिप्लोमसीमुळे गुरुवारी कॅनडाच्या पंतप्रधानांनी जस्टिन ट्रुडो (justin trudeau) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi)कौतुक केले होते. तसेच कॅनडाला भासणाऱ्या लसीच्या गरजेबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्पना दिली होती.

दरम्यान, कॅनडाच्या पंतप्रधानांनी आज शेतकरी आंदोलनाबाबतही भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेबाबत कौतुक केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाबाबत भारत सरकारने केलेल्या चर्चेच्या प्रस्तावाचे कौतुक केले आहे. त्याबरोबरच जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले की, त्यांचे सरकार कॅनडामध्ये असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे.

कोरोनावरील लसीबाबत कॅनडाकडून मदत मागण्यात आली होती. त्यावर भारताने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती. त्यात म्हटले होते की, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी फोन करून कोरोनावरील लसीबाबत चर्चा केली होती. मोदींकडून लसीबाबत मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याशिवाय दोन्ही नेत्यांनी हवामानातील बदल आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केली होती.

याबाबत जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले आहे की, त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी लोकशाहीच्या तत्त्वांसाठी दोन्ही देशांची कटिबद्धता, हल्लीच झालेली आंदोलने आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या महत्त्वावर चर्चा झाली. तसेच आम्ही यापुढेही संपर्कात राहण्याबाबत सहमती दर्शवली, असे ट्रुडो यांनी सांगितले.

Web Title: Corona vaccine needs to be changed in Canada, praises central government stand on Farmers Protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.