corona vaccine : भारतातील खासगी रुग्णालयांना ६०० रुपये दराने मिळणार कोविशिल्ड, सिरमनं दिलं असं स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 05:22 PM2021-04-24T17:22:39+5:302021-04-24T17:23:01+5:30

Corona vaccination Update : कोविशिल्ड लसीसाठी जाहीर केलेल्या दरांवरून सिरम इन्स्टिट्युटवर टीका झाली होती. त्यानंतर आता सिरमकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Corona vaccine: Only a limited portion of Serum Institute of India's volume will be sold to private hospitals at INR 600 per dose,  The explanation given by serum institute | corona vaccine : भारतातील खासगी रुग्णालयांना ६०० रुपये दराने मिळणार कोविशिल्ड, सिरमनं दिलं असं स्पष्टीकरण 

corona vaccine : भारतातील खासगी रुग्णालयांना ६०० रुपये दराने मिळणार कोविशिल्ड, सिरमनं दिलं असं स्पष्टीकरण 

Next

पुणे - कोरोना विषाणूच्या फैलावाने गंभीर रूप धारण केल्यापासून देशभरात कोरोनाविरोधातील लसीची मागणी वाढली आहे. (Corona vaccination in India) त्यामुळे देशातील लसीकरणाच्या मोहिमेवर मोठा ताण आला आहे. त्यातच १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. दरम्यान, देशात कोविशिल्ड लसीचं उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युटने देशांतर्गत वितरणासाठी लसीचे दर जाहीर केले होते. त्यात केंद्र सरकारला १५०, राज्य सरकारांना ४०० आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपये दराने लस देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, या दरांवरून सिरम इन्स्टिट्युटवर टीका झाली आहे. त्यानंतर आता सिरमकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Only a limited portion of Serum Institute of India's volume will be sold to private hospitals at INR 600 per dose,  The explanation given by serum institute)

याबाबत सिरम इन्स्टिट्युटकडून एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सिरम इन्स्टिट्युट उत्पादित होणाऱ्या लसींमधील मोजका साठाच खाजगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रत्येकी दराने विक्री करणार आहे. ही रक्कम कोरोनावरील उपचारांसाठी लागणारी अन्य औषधे आणि साहित्याच्या मनाने फार कमी आहे, असेही सिरमने म्हटले आहे. 

दरम्यान, सीरमची (Serum Institute of India ) लस भारतातच (India) सगळ्यात महाग असल्याची माहिती समोर आली होती. लसीच्या किंमतीवरुन सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

केंद्रानं लसींच्या किंमतीवरील भ्रम दूर करत दोन्ही लसींसाठी १५० रुपयेच देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी यासंदर्भातील एक स्पष्टीकरण दिलं. केंद्र सरकार १५० रूपयांतच या लसी खरेदी करणार असून राज्यांना त्या मोफत दिल्या जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. "दोन्ही लसींच्या खरेदीसाठी भारत सरकारची किंमत १५० रूपये प्रति डोसच आहे. भारत सरकारद्वारे खरेदी करण्यात आलेली लस राज्यांना मोफतच दिली जात राहिल," असं आरोग्य मंत्रालयानं ट्वीट करत म्हटलं आहे. 

Web Title: Corona vaccine: Only a limited portion of Serum Institute of India's volume will be sold to private hospitals at INR 600 per dose,  The explanation given by serum institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.