Corona Vaccine Registration: १२ ते १४ वयोगटासाठी उद्यापासून CoWIN वर लस नोंदणी; जाणून घ्या कशी कराल...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:09 PM2022-03-15T12:09:22+5:302022-03-15T12:09:49+5:30
Corona Vaccine Registration: CoWIN प्लॅटफॉर्मवर 15 ते 18 वयोगटातील मुलांची नोंदणी 1 जानेवारीपासून सुरू झाली होती. मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू झाले होते.
केंद्र सरकारने १४ वर्षे वयापुढील मुले आणि नागरिकांना लस देण्याचा टप्प्या टप्प्याने निर्णय घेतला होता. यामुळे कोरोनाची तिसरी लाट फार काळ तग धरू शकली नाही. आता त्यापुढे आणखी एक पाऊल टाकत केंद्राने १२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. याचे रजिस्ट्रेशन उद्यापासून सुरु होणार आहे.
१२ ते १४ वर्षांमधील मुले उद्या १६ मार्चपासून कोविन प्लॅटफॉ़र्मवर कोरोना लसीसाठी बुकिंग करू शकणार आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. यासह, 60 वर्षांवरील सर्व लोकांना आता बूस्टर डोस मिळणार आहे.
१२ ते १४ वर्षांमधील मुलांना Corvbevax ची लस दिली जाणार आहे. CoWIN प्लॅटफॉर्मवर 15 ते 18 वयोगटातील मुलांची नोंदणी 1 जानेवारीपासून सुरू झाली होती. मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू झाले होते.
नोंदणी कशी करावी
- 12 ते 14 वयोगटातील मुलांना कॉर्बेवॅक्सचा डोस दिला जाईल.
- मुले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह किंवा स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतात. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास मुले त्यांच्या विद्यार्थी ओळखपत्रासह स्वतःची नोंदणी करू शकतात.
- कुटुंबातील चार सदस्य एका मोबाईल नंबरवर नोंदणी करू शकतात.