Corona vaccine: लसींचा वापर सुरक्षित; काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिनमुळे रक्ताच्या गुठळ्या हाेत नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 05:04 AM2021-03-24T05:04:15+5:302021-03-24T05:04:36+5:30
उच्चस्तरीय समितीचा निष्कर्ष, भारतात लसीकरण सुरू झाल्यानंतर लसींच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली हाेती
नवी दिल्ली : काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन या लसींमुळे रक्ताच्या गुठळ्या हाेत नसल्याचे केंद्र सरकारच्या एका उच्चस्तरीय समितीने स्पष्ट केले आहे. या लसींच्या आपत्कालीन वापरास भारताच्या औषध नियंत्रकांनी या वर्षाच्या प्रारंभी मान्यता दिली हाेती.
भारतात लसीकरण सुरू झाल्यानंतर लसींच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली हाेती. या समितीने ४०० हून अधिक दुष्परिणामाच्या घटनांचा अभ्यास केला. त्याचा अहवाल समितीने सादर केला आहे. काेविशिल्ड किंवा काेव्हॅक्सिनमुळे अनियमित रक्तस्राव किंवा रक्ताच्या गुठळ्या बनत नसल्याचे समितीने म्हटले आहे. मात्र, यापुढेही परिस्थितीचा अभ्यास करण्याचे कार्य सुरूच राहील, असे समितीने स्पष्ट केले आहे.
ब्रिटनमधील औषध निर्माती कंपनी ‘ॲस्ट्राझेनेका’ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या काेविशिल्ड या लसीचे भारतात सीरम इन्स्टिट्यूटतर्फे उत्पादन करण्यात येत आहे. तर, भारत बायाेटेक या कंपनीने ‘आयसीएमआर’च्या सहकार्याने स्वदेशी ‘काेव्हॅक्सिन’ लस विकसित केली आहे. अनेक युराेपियन देशांनी या लसीचा वापर थांबविला हाेता. मात्र, युराेपियन औषध नियंत्रकांनी लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर लसीचा पुनर्वापर सुरू झाला आहे.
सर्दीचा विषाणू करताे काेराेनाच्या विषाणूचा खात्मा
पृथ्वीवरील प्राणिमात्रांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू असताे. डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांतामागे हा महत्त्वपूर्ण नियम आहे. हा नियम विषाणूंमध्येही आढळून आला असून, अशा संघर्षातून काेराेनाच्या विषाणूलाही एक विषाणू संपवित असल्याचे दिसून आले आहे. हा विषाणू अगदी साध्या सर्दी-पडश्याला कारणीभूत असलेला विषाणू हाेय. हा विषाणू ‘ऱ्हायनाेव्हायरस’ म्हणून ओळखला जाताे. ब्रिटनच्या ग्लासगाे विद्यापीठाने याबाबत केलेल्या संशाेधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विषाणू आणि जंतू हे मानव किंवा इतर प्राण्यांच्या शरीरात वास्तव्य करतात. काही विषाणू एकत्रितपणे मानवी शरीरात मित्रांप्रमाणे राहतात. मानवी पेशींवर हे विषाणू एकत्रपणे हल्ला करतात.