Corona vaccine: कोरोना लस टंचाई? केंद्राने १.२९ कोटी डोस दिले, खासगी रुग्णालयांनी फक्त १७ टक्के वापरले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 06:32 AM2021-06-13T06:32:52+5:302021-06-13T06:33:20+5:30

सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांत कोरोना लसीच्या किंमती अधिक आहेत. तसेच लस घेण्याबाबत अनेक लोकांच्या मनात अद्यापही संभ्रम आहे. या गोष्टींच्या परिणामी लोक लस घेण्यासाठी खासगी रुग्णालयांकडे फारसे वळले नाहीत असे म्हटले जाते. 

Corona vaccine scarcity? center provided 1.29 crore doses, while private hospitals used only 17 per cent | Corona vaccine: कोरोना लस टंचाई? केंद्राने १.२९ कोटी डोस दिले, खासगी रुग्णालयांनी फक्त १७ टक्के वापरले

Corona vaccine: कोरोना लस टंचाई? केंद्राने १.२९ कोटी डोस दिले, खासगी रुग्णालयांनी फक्त १७ टक्के वापरले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशातील खासगी रुग्णालयांना मे महिन्यात मिळालेल्या कोरोना लसींपैकी फक्त १७ टक्के लसींचा वापर झाला आहे. या रुग्णालयांत कोरोना लसींच्या असलेल्या किंमती खिशाला परवडत नसल्याने तिथे मोठ्या संख्येने लोक गेले नसावेत अशी शक्यता वर्तविली जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मे महिन्यामध्ये सरकारी व अन्य रुग्णालयांना कोरोना लसीचे ७.१४ कोटी डोस देण्यात आले. त्यातील १.८५ कोटी डोस खासगी रुग्णालयांना देण्यात येणार होते. त्याऐवजी १.२९ कोटी डोस पाठविण्यात आले. त्यातील फक्त २२ लाख कोरोना डोस खासगी रुग्णालयांनी लोकांना दिले आहेत.

सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांत कोरोना लसीच्या किंमती अधिक आहेत. तसेच लस घेण्याबाबत अनेक लोकांच्या मनात अद्यापही संभ्रम आहे. या गोष्टींच्या परिणामी लोक लस घेण्यासाठी खासगी रुग्णालयांकडे फारसे वळले नाहीत असे म्हटले जाते. 
या रुग्णालयांकरिता केंद्र सरकारने कोरोना लसीचे दर ठरवून दिले आहेत. खासगी रुग्णालयात कोविशिल्ड ७८० रुपये व स्पुतनिक व्ही ११४५ रुपये व कोवॅक्सिन लस १४१० रुपयांना उपलब्ध आहे.

नव्या धोरणाची योगदिनाशी सांगड
n    केंद्र सरकार नवे लस धोरण येत्या २१ जून रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिनापासून राबविणार आहे.
n    कंपन्या बनवत असलेल्या कोरोना लसींपैकी ७५ टक्के लसी केंद्र सरकार विकत घेईल. २५ टक्के लसी खासगी रुग्णालये खरेदी करू
शकतील.

Web Title: Corona vaccine scarcity? center provided 1.29 crore doses, while private hospitals used only 17 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.