Corona vaccine : सीरम दहमहा १० कोटी, तर भारत बायोटेक ७.८ कोटी लसींचे उत्पादन करणार, लसींची टंचाई दूर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 11:04 PM2021-05-12T23:04:17+5:302021-05-12T23:05:00+5:30

Corona vaccine News: देशात वाढत्या मागणीमुळे लसींचे उत्पादन कमी पडत असल्याने कोरोनाविरोधातील लसींची टंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाबाबत दिलासा देणारी माहिती आज समोर आली आहे.

Corona vaccine: Serum 10 crore per month, while India Biotech will produce 7.8 crore vaccines, vaccine shortage will be eliminated | Corona vaccine : सीरम दहमहा १० कोटी, तर भारत बायोटेक ७.८ कोटी लसींचे उत्पादन करणार, लसींची टंचाई दूर होणार

Corona vaccine : सीरम दहमहा १० कोटी, तर भारत बायोटेक ७.८ कोटी लसींचे उत्पादन करणार, लसींची टंचाई दूर होणार

googlenewsNext

नवी दिल्ली - एकीकडे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग मात्र म्हणावा तसा वाढलेला नाही. त्यातच आता देशात वाढत्या मागणीमुळे लसींचे उत्पादन कमी पडत असल्याने कोरोनाविरोधातील लसींची टंचाई निर्माण झाली आहे. (Corona vaccine News) त्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाबाबत दिलासा देणारी माहिती आज समोर आली आहे. सीरम इंस्टिट्युट आणि भारत बायोटेक या भारतातील कोरोनाविरोधातील लसींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी लसींच्या उत्पादनाबाबतचा अहवाल केंद्र सरकारला एक अहवाल दिला आहे. (Serum 10 crore per month, while India Biotech will produce 7.8 crore vaccines, vaccine shortage will be end)

या अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार सीरम इन्स्टिट्युटने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत किंवा सुरुवातीपासून दरमहा १० कोटी कोविशिल्ड लसी उत्पादित करणार असल्याचे सांगितले आहे. तर भारत बायोटेकची उत्पादन क्षमताही वाढणार असून, कोव्हॅक्सिनची निर्मिती करणारी ही कंपनी दरमहा ७.८ कोटी लसींचे उत्पादन करणार आहे.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य मंत्रालय आणि ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या दोन्ही लसनिर्मात्या कंपन्यांकडे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या उत्पादनाबाबतची माहिती मागितली होती. त्याला प्रत्युत्तरदाखल दोन्ही कंपन्यांनी लसींचे उत्पादन वाढवण्याबाबत माहिती दिली. 
 
भारत बायोटेकचे संचालक व्ही. कृष्ण मोहन यांनी सरकारला सांगितले की, जुलै महिन्यामध्ये कोव्हॅक्सिनचे उत्पादन ३.३२ कोटी आणि ऑगस्ट महिन्यात ७.८२ कोटी रुपये होईल. तर सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियामध्ये सरकार आणि नियामक बाबतचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी सांगितले की, कोविशिल्डचे उत्पादन ऑगस्ट महिन्यात १० कोटी लसींचे उत्पादन होईल आणि सप्टेंबर महिन्यात ते अधिक वाढेल.  

Web Title: Corona vaccine: Serum 10 crore per month, while India Biotech will produce 7.8 crore vaccines, vaccine shortage will be eliminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.