Corona Vaccine : Covishield लसीसंदर्भात सिरम इन्स्टिट्यूटची मोठी मागणी, सरकारकडे केला नवा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 03:14 PM2021-12-31T15:14:09+5:302021-12-31T15:15:13+5:30
सीरम इन्स्टिट्यूट Covishield नावाने AstraZeneca ची कोरोना लस तयार करत आहे. सीरम इन्स्टिट्यूटने आतापर्यंत देशात 1.25 बिलियनहून अधिक लसीच्या डोसचा पुरवठा केला आहे.
देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेवर आतापर्यंत कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचाच दबदबा राहिला आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी शुक्रवारी सांगितले, की सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देशाच्या औषध नियामक आणि आरोग्य मंत्रालयाकडे त्यांच्या कोविशील्ड लसीसाठी संपूर्ण मंजुरीसाठी अर्ज केला आहे.
सीरम इन्स्टिट्यूट Covishield नावाने AstraZeneca ची कोरोना लस तयार करत आहे. सीरम इन्स्टिट्यूटने आतापर्यंत देशात 1.25 बिलियनहून अधिक लसीच्या डोसचा पुरवठा केला आहे. यातच सीईओ आदर पूनावाला यांनी ट्विट करत माहिती दिली आहे, की 'भारतात 1.25 अब्जहून अधिक कोविशील्ड लसींचा पुरवठा झाला आहे. आता भारत सरकारकडे संपूर्ण मार्केट ऑथराइजेशनसाठी पुरेसा डेटा उपलब्ध आहे. यामुळे, सीरम इन्स्टिट्यूटने CDSO, DCGI आणि आरोग्य मंत्रालयाकडे फुल मार्केट ऑथराइजेशनसाठी अर्ज केला आहे.'
Supplies of the COVISHIELD vaccine in India, have exceeded 1.25 billion doses. The government of India now has enough data for full market authorisation, and therefore @SerumInstIndia has applied to the @CDSCO_INDIA_INF (DCGI) and @MoHFW_INDIA for this permission.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) December 31, 2021
सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात कोविडशील्ड लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली होती. सीरम इन्स्टिट्यूट अॅस्ट्राझेनेकाच्या शॉट्सची मासिक क्षमता सातत्याने वाढवत आहे, असे पूनावाला यांनी ऑक्टोबर महिन्यातच म्हटले होते.