Fake Corona Vaccine: बनावट कोरोना लस बनवणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, वाराणसीतून 5 आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 01:24 PM2022-02-02T13:24:02+5:302022-02-02T13:26:47+5:30

Fake Corona Vaccine: वाराणसी एसटीएफने बनावट लस आणि टेस्टींग किटसह 4 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Corona Vaccine | Varanasi | Fake corona vaccine racket burst by UP STF, raid at Varanasi; 5 accused arrested | Fake Corona Vaccine: बनावट कोरोना लस बनवणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, वाराणसीतून 5 आरोपी अटकेत

Fake Corona Vaccine: बनावट कोरोना लस बनवणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, वाराणसीतून 5 आरोपी अटकेत

googlenewsNext

वाराणसी: वाराणसीमध्ये कोरोनाची बनावट लस आणि चाचणी किट बनवून देशाच्या इतर राज्यांना पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. बुधवारी, यूपी-एसटीएफच्या वाराणसी युनिटने लंका पोलिस स्टेशन अंतर्गत रोहित नगरमधील एका घरावर छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला. 

5 आरोपी अटकेत
पोलिसांनी याप्रकरणी 5 आरोपींना अटक केली आहे. तसेच, पोलिसांनी आरोपींकडून Coveshield आणि Zycov-d च्या बनावट लसी, बनावट चाचणी किट, पॅकिंग मशीन, रिकाम्या कुपी आणि स्वॅब स्टिक जप्त केल्या आहेत. एसटीएफचे अतिरिक्त एसपी विनोद कुमार सिंह यांनी सांगितले की, सिद्धगिरी बागेतील धनश्री कॉम्प्लेक्समधील राकेश थवानी, बौलिया लहरतारा येथील अरुणेश विश्वकर्मा, पठाणी टोला चौकातील संदीप शर्मा, बलिया जिल्ह्यातील नागपुर रसडा येथील समशेर आणि नवीन मालवीय नगर येथील लक्ष्य अशी आरोपींची नावे आहेत. 

4 कोटींचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी सध्या सर्व आरोपींची चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे रॅकेट बनावट लस आणि टेस्ट किट बनवून दिल्लीमार्गे दक्षिण भारतातील अनेक राज्यांना पुरवठा करत होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या सर्व वस्तुंची अंदाजे किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे.

असे करायचे काम
एसटीएफच्या चौकशीत राकेश थवानीने सांगितले की, तो संदीप शर्मा, अरुणेश विश्वकर्मा आणि समशेर यांच्यासोबत बनावट लसी आणि टेस्टिंग किट बनवण्याचे काम करत होता. तो ही बनावट लस आणि किट आरोपी लक्ष्य जावा याला पुरवायचा. लक्ष्य त्याच्या नेटवर्कद्वारे या बनावट लसी वेगवेगळ्या राज्यांमध्ये पुरवत असे.

Web Title: Corona Vaccine | Varanasi | Fake corona vaccine racket burst by UP STF, raid at Varanasi; 5 accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.