Corona Vaccine : कौतुकास्पद! 'या' गावातील लोक झाले 'लस'वंत; 18 किमी चालून आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलं लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 10:00 AM2021-06-09T10:00:15+5:302021-06-09T10:08:14+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासआठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही दोन कोटींच्या वर गेली आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर येत आहे. देशात एक असं गाव आहे जिथे 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) बांदीपोरा जिल्ह्यातील वेयान हॅमलेट हे गाव देशातलं पहिलं असं गाव ठरलं आहे, जिथे 18 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावात एकूण 362 वयस्कर लोक आहेत आणि त्या सर्वांनी लस घेतलेली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि जिद्दीमुळे हे शक्य झालं आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेयान हे गाव बांदीपोरा जिल्हा मुख्यालयापासून केवळ 28 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र तिथे जाण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना जवळपास 18 किलोमीटरपर्यंत चालत जावं लागतं असं म्हटलं आहे.
बांदीपोरा जिल्ह्याचे मुख्य चिकित्सा अधिकारी बशीर अहमद खान यांनी सांगितलं की गावात इंटरनेट सुविधा नसल्याने शहरातील लोकांप्रमाणे येथे लोक ऑनलाईन नोंदणी करू शकत नाही. त्यामुळे इथे नोंदणी झाली नाही. गावातली लसीकरण मोहिम जम्मू-काश्मीर मॉडेलच्या अंतर्गत करण्यात आली. हे मॉडेल म्हणजे पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना लस टोचण्याची 10 सूत्र असलेली एक रणनीती आहे. कोरोना लसीकरणामुळे सर्वत्र याच गावाची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. अशीच एक घटना चेन्नईमध्ये घडली आहे.
Corona Vaccine : लस घेणाऱ्यांना एक प्लेट बिर्याणी आणि मोबाईल रिचार्जचंही कूपन; भन्नाट ऑफरमुळे 'या' ठिकाणी भल्या मोठ्या रांगा#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronaVaccine#CoronaVaccinationhttps://t.co/cmPC3YbS6L
— Lokmat (@MiLOKMAT) June 8, 2021
भारीच! "कोरोना लस घ्या आणि सोन्याची नाणी, स्कूटी, वॉशिंग मशीनसह भरपूर गिफ्ट्स मिळवा"
कोवलम भागातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी एका सेवाभावी संस्थेने लोकांना भन्नाट ऑफर दिली आहे. कोवलममध्ये एका सेवाभावी संस्थेच्या वतीने लस घेणाऱ्यांना एक प्लेट बिर्याणी आणि मोबाईल रिचार्जचं कूपन दिलं जात आहे. याशिवाय दर आठवड्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून नागरिकांना सोन्याची नाणी, मिक्सर, स्कूटी, वॉशिंग मशीन अशा महागड्या गोष्टीही जिंकता येत आहेत. बक्षिसांसाठी अट फक्त एकच आहे ती म्हणजे कोरोना लस घेतली पाहिजे. कोवलम या भागाची लोकसंख्या साधारण 14,300 इतकी आहे. यामध्ये 18 वर्षांवरील वयोगटातले 6400 जण आहेत. या संस्थेचं म्हणणं आहे की अशा योजनांमुळे लस घेण्यासाठीची प्रेरणा मिळत आहे. या गावातील लोकांमध्ये लसीकरणाबाबत प्रचंड भीती आहे. त्यामुळे या गावातलं लसीकरण संथ गतीने सुरू होतं. सुरुवातीच्या काळात लसीकरण केंद्रांवर केवळ 50 ते 60 जण उपस्थित असायचे. मात्र, या संस्थेने नव्या योजनेची सुरुवात केल्यानंतर मात्र लस घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
CoronaVirus Live Updates : ऑक्सिजनचा मोठा तुटवडा! 22 रुग्णांना गमवावा लागला जीव; जाणून घ्या 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#oxygenshortagehttps://t.co/nIjZM8Ot2U
— Lokmat (@MiLOKMAT) June 8, 2021