Corona Vaccine: जगातील पहिली नेजल व्हॅक्सिन भारतात झाली लॉन्च; जाणून घ्या किती आहे किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 05:53 PM2023-01-26T17:53:40+5:302023-01-26T17:54:06+5:30

ही लस लावण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्याची गरज भासणार नाही

Corona Vaccine: World's first nasal vaccine launched in India; Know how much it costs? | Corona Vaccine: जगातील पहिली नेजल व्हॅक्सिन भारतात झाली लॉन्च; जाणून घ्या किती आहे किंमत?

Corona Vaccine: जगातील पहिली नेजल व्हॅक्सिन भारतात झाली लॉन्च; जाणून घ्या किती आहे किंमत?

googlenewsNext

नवी दिल्ली - २६ जानेवारी रोजी भारत बायोटेकनं देशातील पहिली नेजल व्हॅक्सिन लॉन्च केली आहे. ही व्हॅक्सिन देशात कोरोनाविरुद्धच्या लढाईत फायदेशीर सिद्ध होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडाविया आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही लस लॉन्च केली आहे. या व्हॅक्सिनचं नाव iNCOVACC ठेवण्यात आले आहे. ही जगातील पहिली कोरोना व्हायरसची नेजल व्हॅक्सिन आहे. ही लस कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड घेतलेलेही बूस्टर डोस म्हणून घेऊ शकतात. 

मंडाविया आणि सिंह यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही लस लॉन्च केली. ही लस खासगी रुग्णालयांमध्ये प्रति शॉट ८०० रुपये, तर सरकारी रुग्णालयांमध्ये केवळ ३२५ रुपये प्रति शॉट या दराने उपलब्ध केली जाईल. भारत बायोटेकने ही लस लॉन्च करण्यासाठी आधीच माहिती जारी केली होती. हैदराबादस्थित भारत बायोटेनने वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने ही लस विकसित केली आहे. नाकातून स्प्रेद्वारे दिली जाणारी लस प्राथमिक आणि बूस्टर डोस म्हणून घेतली जाऊ शकते.

ही लस भारत सरकारने गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजी वापरण्यासाठी मंजूर केली होती. लॉन्च करण्यापूर्वी ही लस सर्वप्रथम खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगण्यात आले. इतर दोन लसींप्रमाणे, या लसीचा डोस मिळविण्यासाठी कोविन वेबसाइटवरून स्लॉट बुक केले जाऊ शकतात. या नेजल लसीचे जबरदस्त फायदे जाणून घ्या. 

नेजल व्हॅक्सिन ही अशी लस आहे जी नाकातून थेट दिली जाते. ते कोणालाही अगदी सहज देता येते. यामध्ये त्याला इंट्रानासल लस म्हणतात. आता डोस देण्यासाठी कोणालाही कोणत्याही प्रकारच्या इंजेक्शनची गरज भासणार नाही. 

या नेजल लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ही सामान्यतः कोरोनाचा बूस्टर डोस किंवा प्राथमिक लस म्हणून दिली जाऊ शकते. ही नेजल लस Covaxin आणि Covishield या दोन्ही लस घेतलेल्यांसाठी बूस्टर म्हणून दिली जाऊ शकते.

ही लस लावण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्याची गरज भासणार नाही. कारण ती थेट नाकातून दिली जाणार आहे. दुसरीकडे, तिचा दुसरा मोठा फायदा म्हणजे त्याच्या स्टोरेजची समस्या देखील कमी होईल. सध्या देण्यात येत असलेल्या लसींच्या साठवणुकीसाठी सरकारला मोठा संघर्ष करावा लागत आहे.
 

Web Title: Corona Vaccine: World's first nasal vaccine launched in India; Know how much it costs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.