Corona Virus : हाहाकार! भारतात कोरोना पसरण्याचा वेग धडकी भरवणारा, Omicron मुळं जगभरात एवढ्या लोकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 06:12 PM2022-01-05T18:12:08+5:302022-01-05T18:12:34+5:30
युरोपियन युनियन आणि अमेरिकेत नव्या व्हेरिअंटमुळे अधिक नुकसान झाले आहे. पण, येथे अधिक लोकांना संसर्ग झाला असला तरी, कमी लोकांनाच रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे, अशी माहितीतीही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. भारत सरकारनेही याच्या गंभीरतेची पुष्टी करत जी आकडेवारी जारी केली आहे ती अत्यंत भयावह आहे. आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरात 19.4 लाख संसक्राची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर आतापर्यंत Omicron प्रकारामुळे जगभरात 108 लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतात गेल्या 8 दिवसांत कोरोना रुग्ण संख्येत 6.3 पटीपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर 29 डिसेंबर 2021 रोजी 0.79% वरून 5 जानेवारीला 5.03% वर पोहोचला. महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्या 4 पट वाढली आहेत, तर राजधानी दिल्लीतील रुग्ण संख्येत 9 पट वाढ झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, झारखंड, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
युरोपियन युनियन आणि अमेरिकेत नव्या व्हेरिअंटमुळे अधिक नुकसान झाले आहे. पण, येथे अधिक लोकांना संसर्ग झाला असला तरी, कमी लोकांनाच रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे, अशी माहितीतीही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील रुग्ण संख्येने शिखर गाठले आहे. मात्र, केवळ 90,000 लोकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली आहे. फ्रान्स, डेन्मार्क आणि यूकेमध्येही असाच ट्रेंड आहे.