Corona Virus: केरळमध्ये कोरोनाचे ५ नवे संशयित; देशातील रूग्णांची संख्या ३९ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 01:17 AM2020-03-09T01:17:36+5:302020-03-09T01:17:57+5:30
१२ देशांतून येणाऱ्यांसाठी विमानतळावर स्वतंत्र डेस्क; औषधफवारणी, स्वच्छतेवर भर
तिरुवनंतरपुरम / नवी दिल्ली : केरळात आणखी पाच लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील तीन जण अलिकडेच इटलीचा प्रवास करुन परतले होते. यामुळे भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ३९ वर पोहोचली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नवी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाºया प्रत्येकाची कसून तपासणी होत आहे. १२ बारा देशांमधून येणाºया प्रवाशांसाठी स्वतंत्र डेस्क उभारला आहे. विमानातून उतरल्यावर या देशातील प्रवाशांना एरोब्रिजवरून आणले जाते. विमान लँड झाल्यावर दारातून विमानतळात प्रवेश करणाचा मार्गही तात्काळ स्वच्छ केला जात आहे.
केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले की, एक आठवड्यापूर्वी इटलीतून आलेले दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा यांनी विमानतळावरील तपासणी चुकविली होती. सर्व पाच जण पथनामथिट्टा जिल्ह्यातील रन्नीचे निवासी आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. यापूर्वी राज्यात तीन लोकांना संसर्ग झाला होता.
के. के. शैलजा यांनी सांगितले की, ५० वर्षीय दाम्पत्याने आपल्या २४ वर्षीय मुलासह २९ फेब्रुवारी रोजी इटलीहून भारतासाठी उड्डाण केले होते. तर, दोन अन्य लोक त्यांचे नातेवाईक आहेत. व्हेनिसहून आलेल्या या तीन जणांनी अधिकाऱ्यांना सूचित केले नव्हते की, ते इटलीहून आले आहेत. जेव्हा त्यांचे हे दोन नातेवाईक या विषाणुंच्या लक्षणामुळे हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा आरोग्य अधिकाºयांना इटलीहून आलेल्या लोकांबाबत माहिती मिळाली. ते विमानतळावरुन तपासणी न करता निघाले होते. या लोकांनी जेव्हा आरोग्य अधिकाºयांशी सहकार्य करण्यास नकार दिला तेव्हा त्यांना जबरदस्तीने पथनामथिट्टाच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांना वेगळ्या वॉर्डमध्ये निगराणीत ठेवले आहे. त्यांना ६ मार्च रोजी भरती करण्यात आले होते आणि शनिवारी रात्री त्यांना संसर्ग झाल्याचा अहवाल आला.
दक्षिण कोरियात आणखी २७२ रुग्ण आढळले
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव चीनच्या ज्या वुहानमध्ये झाला आहे त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेणाºया तीन विद्यार्थ्यांना उपचारानंतर हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली होती. चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांना ठेवलेले हॉटेल कोसळून १० जण ठार झाले आहेत.
कोरोनामुळे इटलीतील चित्रपटगृहे आणि संग्रहालये बंद ठेवण्यात आली आहेत. दक्षिण अफ्रिकेत तीन जणांना बाधा झाली आहे तर दक्षिण कोरियात कोरोनाचे आणखी २७२ रुग्ण आढळून आले आहेत.
फेसबुकवर अफवा पसरविणाºयावर गुन्हा
अरुणाचलच्या पूर्व सियांग जिल्ह्यात कोरोनाबाबत सोशल मीडियात चुकीच्या पोस्ट करणाºया सुबु केना शेरिंग या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या तक्रारीवरुनर सुबु केना शेरिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुबुने फेसबुकवर पोस्ट केले की, कोरोना विषाणु पासीघाटला पोहचला आहे आणि दोन रुग्णांना आसामच्या दिब्रुगडमध्ये पाठविण्यात आले आहे.