गड्या आपला गावच बरा... लॉकडाऊनमुळे गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 09:54 AM2020-05-03T09:54:19+5:302020-05-03T09:54:35+5:30
देशातील लॉकडाऊनचा दुसरा टप्पा आज पूर्ण होत असून तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. लॉकडाऊनच्या काळात देशातील लोकसंख्येत कसा परिणाम झाला हेही महत्वाचे आहे
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वीच मोठ्या शहरात रोजगारासाठी, नोकरीसाठी, उद्योगासाठी आलेल्या नागरिकांनी आपला गाव गाठायला सुरुवात केली होती. जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीच्या संकटापासून वाचायचं असेल तर, गाव हेच सर्वात सुरक्षित ठिकाण नागरिकांना वाटू लागले. त्यामुळेच, मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरु या हायटेक सिटीतून नागरिकांना, गड्या आपला गावच बरा.. असे म्हणत गावाची वाट पकडली. देशात गेल्या ४० दिवसांपासून लॉकडाऊन सुरु असून ते १७ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे.
देशातील लॉकडाऊनचा दुसरा टप्पा आज पूर्ण होत असून तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. लॉकडाऊनच्या काळात देशातील लोकसंख्येत कसा परिणाम झाला हेही महत्वाचे आहे. यांसंदर्भात सेंटर ऑफ पॉलिसी रिसर्च यांचा एक अहवाल समोर येत आहे. त्यानुसार, शहरातील लोकसंख्या ११ टक्क्यांनी कमी झाली असून गावातील लोकसंख्या ७ टक्क्यांनी वाढली आहे. लॉकाडाऊनमुळे सध्या शहरात कुणीही येत नाही.
सीपीआर चे वरिष्ठ विद्यार्थी आणि स्टी के चे सहायक लेखल पार्थ मुखोपाध्याय यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे लाखों लोक आता शहरांकडे येत नाहीत. त्यामुळेच, शहरांजवळी ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढली आहे. पश्चिमी राजस्थान, ओडिशाजवळ हे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मजूरांचे गावाकडे पलायन हे याचे मुख्य कारण असल्याचे समजते. दक्षिण भारतातील बंगळुरु, चेन्नई आणि मदुरै या मोठ्या शहरांमध्ये हाच परिणाम दिसून येत आहे.
Coronavirus: इतर कुठलीही प्रवासी रेल्वे सुरू होणार नाही, रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
देशात मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जास्त लोकसंख्या दिसून येत नाही. या राज्यातून मोठ्या प्रमाणात लोकं दुसऱ्या राज्यात कामाच्या शोधात जातात. मात्र, रेल्वे सेवा बंद असल्याने आणि आंतरराज्य वाहतूक बंद केल्याने ते अडकून पडले आहेत. दरम्यान, ही आकडेवारी गुगलच्या मोबॅलिटी अहवालानुसार ज्या नागरिकांनी आपली लोकेशन हिस्ट्री ऑन ठेवली आहे, त्या नागरिकांची या सर्वेक्षणात गणना झाली आहे.