देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न - राज्यमंत्री पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:31 AM2022-04-20T11:31:02+5:302022-04-20T11:31:57+5:30

सुरेश भुसारी -  नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात ४० लाख जण दगावले असल्याचा दावा करणारे वृत्त चुकीच्या माहितीवर आधारित ...

Corona virus Attempt to tarnish the image of the country, Minister of State Pawar | देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न - राज्यमंत्री पवार

देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न - राज्यमंत्री पवार

googlenewsNext

सुरेश भुसारी - 

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात ४० लाख जण दगावले असल्याचा दावा करणारे वृत्त चुकीच्या माहितीवर आधारित असून यातून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा हवाला देऊन भारतात कोरोनामुळे ४० लाख लोक दगावले असल्याचा दावा केला आहे. यावरून केंद्र सरकार मृतांची खरी आकडेवारी लपवीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना डॉ. पवार म्हणाल्या, “भारताला आकडे लपविण्याची कोणतीही गरज नाही. 

चौथी लाट नाही -
दिल्लीत कोरोना रुग्ण वाढलेले आहेत. हे खरे असले तरी देशात चौथी लाट येण्याची शक्यता वाटत नाही. देशातील आरोग्य यंत्रणा कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचा दावाही डॉ. पवार यांनी केला.

Web Title: Corona virus Attempt to tarnish the image of the country, Minister of State Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.