Corona Virus:कोरोना निर्बंध अजून महिनाभर, ३१ डिसेंबरपर्यंत प्रतिबंध कायम; संसदेत आज होणार ‘ओमायक्राॅन’वर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 06:51 AM2021-12-01T06:51:01+5:302021-12-01T06:51:36+5:30
Corona Virus: काेराेना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्राॅनची वर्गवारी ‘अतिशय धोकादायक’ अशी करण्यात आली आहे. या व्हेरिएंटची संसर्गक्षमता कैकपटींनी असल्याने केंद्र सरकारने सध्याच्या काेराेना प्रतिबंधक नियमांना ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : काेराेना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्राॅनची वर्गवारी ‘अतिशय धोकादायक’ अशी करण्यात आली आहे. या व्हेरिएंटची संसर्गक्षमता कैकपटींनी असल्याने केंद्र सरकारने सध्याच्या काेराेना प्रतिबंधक नियमांना ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लाेकसभेमध्ये ओमायक्राॅनबाबत उद्या, बुधवारी चर्चा करण्यात येणार आहे.
ओमायक्राॅन व्हेरिएंट अतिशय धाेकादायक असल्याचे जागतिक आराेग्य संघटनेने म्हटले आहे. यासंबंधी आराेग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांसाेबत बैठक घेतली. त्यात त्यांनी सर्व राज्यांना खबरदारीच्या सूचना केल्या. केंद्राने २५ नाेव्हेंबरला ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जाहीर केली हाेती. त्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
भारतात 'ओमायक्रॉन' चा शिरकाव नाही
दक्षिण आफ्रिकेतून येत असलेल्या प्रवाशांमुळे भारतात 'ओमायक्रॉन' चा शिरकाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. भारतात मात्र आतापर्यंत ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
- डॉ. मनसुख मांडवीय,
केंद्रीय आरोग्यमंत्री
आयडेंटिफायरकडे यंत्रणांनी लक्ष ठेवावे
प्रयाेगशाळांनी स्मार्ट वर्क केल्यास ओमायक्राॅनची ओळख पटविता येईल. स्पाइक प्राेटिनमध्ये नसलेल्या आयडेंटिफायरकडे लक्ष ठेवत असे नमुने जनुकीय तपासणीसाठी नाेंदवून सरकारला माहिती द्यावी.
- डॉ. रमण गंगाखेडकर, माजी प्रमुख, आयसीएमआर साथरोग विभाग
आरटी-पीसीआरद्वारे ओळख पटविणे शक्य
nआरटी-पीसीआर चाचण्यांद्वारे ओमायक्राॅन व्हेरिएंट ओळखता येणे शक्य असल्याचे जागतिक आराेग्य संघटनेने म्हटले आहे.
nत्यामुळे वेळेवर निदान करण्याच्या दृष्टीने हा एक
माेठा दिलासा आहे.
nसध्या करण्यात येत
असलेल्या काही आरटी-पीसीआर चाचण्यांद्वारे ओमायक्राॅनचा संसर्ग ओळखता येऊ शकताे.
nतर काही चाचण्यांद्वारे
ओमायक्राॅनच्या संसर्गाची
शक्यता व्यक्त करता येऊ शकते.
nओमायक्राॅनच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
अशी पटेल ओळख?
nआरटी-पीसीआर चाचणीद्वारे मानवी शरीरात दाेन किंवा अधिक विषाणूंच्या जनुकीय आयडेंटिफायरचे अस्तित्व तपासण्यात येते.
nएक आयडेंटिफायरमध्ये
बदल झालेला असल्यास दुसऱ्या आयडेंटिफायरचा अहवाल पाॅझिटिव्ह येताे.
nबहुतांश चाचण्यांमध्ये काेराेना विषाणूच्या स्पाईक प्राेटीन
आयडेंटिफायर तपासण्यात येताे.
nएखाद्या विशिष्ट भागातील विषाणूचे आयडेंटिफायर चाचणीत आढळले आणि स्पाइक प्रोटिनमध्ये आयडेंटिफायर न आढळल्यास संबंधित व्यक्तीला ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्याची शक्यता असू शकते.