Corona Virus: घाबरू नका! मी बरा झालोय; हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर कोरोनाग्रस्ताने सांगितला 'अनुभव'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 09:41 AM2020-03-16T09:41:43+5:302020-03-16T09:48:14+5:30

Corona Virus: एका शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात अशाप्रकारे सुविधा देण्यात येत आहे यावर मला विश्वास बसला नाही.

Corona Virus: Don't panic! I'm cured; Delhi's First Corona virus Patient, Now Recovered pnm | Corona Virus: घाबरू नका! मी बरा झालोय; हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर कोरोनाग्रस्ताने सांगितला 'अनुभव'

Corona Virus: घाबरू नका! मी बरा झालोय; हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर कोरोनाग्रस्ताने सांगितला 'अनुभव'

Next
ठळक मुद्देहॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षात मी चाणक्य निती हे पुस्तकही वाचलं दिल्लीतला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण झाला बरा घरी १४ दिवस बाहेर न पडण्याची डॉक्टरची सूचना

नवी दिल्ली - जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसचा अनेकांनी धसका घेतला आहे. आतापर्यंत ६ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या या व्हायरसचा प्रार्दुभाव अन्य देशांमध्ये पोहचला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०० च्या वर पोहचली आहे. 

मात्र या आजाराबाबत सकारात्मक बातमी दिल्लीतून समोर येत आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेला व्यक्ती पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे. हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात या रुग्णाला ठेवण्यात आलं होतं. मात्र विलगीकरण कक्ष म्हणजे नेमका कसा आहे याची कल्पना बाहेरच्या व्यक्तींना नाही. दिल्लीतल्या सफरजंग हॉस्पिटलमधून विलगीकरण कक्षातून बाहेर पडलेले रोहित दत्ता यांनी त्यांचा अनुभव कथन केला आहे. 

विलगीकरण कक्ष सोयीसुविधांनी सुसज्ज असा रुम आहे जो एका हॉटेलच्या लक्झरी रुमपेक्षा कमी नाही.  एका शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात अशाप्रकारे सुविधा देण्यात येत आहे यावर मला विश्वास बसला नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली रुम आहे. दरदिवशी याठिकाणी साफसफाई करण्यात येत होती. त्याचसोबत मोबाईल फोन वापरण्याची परवानगी होती त्यामुळे मी माझ्या कुटुंबाशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधत होतो. त्याचसोबत नेटफिल्क्सवर व्हिडीओ पाहत होतो. मागील १४ दिवसांपासून मला त्या कक्षात ठेवण्यात आलं होतं असं रोहित दत्ता यांनी सांगितले. 

रोहित दत्ता यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलं असून खबरदारी म्हणून त्यांना घरातून १४ दिवस बाहेर न पडण्याची सूचना दिली आहे. विलगीकरण कक्षात मी रोज प्राणायम करत होतो. हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य मोलाचे ठरले. पहिल्यांदा मला त्रास झाला तेव्हा तपासणी करण्यात आली त्यानंतर कोरोनाची लागण झाल्याने मी घाबरून गेलो. पण डॉक्टरांनी मला या आजाराबाबत समजवल्यानंतर माझी भीती दूर झाली. जीव धोक्यात घालून डॉक्टर रुग्णांची काळजी घेतात. मात्र ते आमचं कर्तव्य आहे असं डॉक्टरांनी सांगितल्याचं दत्ता म्हणाले. 

रोहित दत्ता हे टेक्सटाइल व्यवसाय करतात. काही कामानिमित्त फेब्रुवारी महिन्यात ते इटली येथे गेले होते. ज्यावेळी मी गेलो तेव्हा इटलीत या आजाराचा प्रार्दुभाव झाला नसल्याची माहिती होती. काही नातेवाईकांसोबत त्यांनी युरोपियन देशांचा दौरा केला होता. 
बाहेर ज्याप्रकारे कोरोना व्हायरसबाबत सांगितलं जात आहे तेवढा हा आजार भयंकर नाही. या आजारात कोण लोक मरत आहेत याची माहिती देण्यात येत नाही. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांना या आजाराने धोका आहे. सामान्य व्हायरस ४-५ दिवसात बरा होतो तर कोरोनासाठी १५-१६ दिवस लागतात. आवश्यक उपचार घेतल्यानंतर कोरोना पूर्णपणे बरा होता. १४ दिवस घरात राहावं लागणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बाहेर जावू नये अशी सूचना देण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षात मी चाणक्य निती हे पुस्तकही वाचलं असल्याचं रोहित दत्ता यांनी सांगितले.  
 

Web Title: Corona Virus: Don't panic! I'm cured; Delhi's First Corona virus Patient, Now Recovered pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.