CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 05:09 PM2020-06-21T17:09:19+5:302020-06-21T17:27:14+5:30
गंभीर असलेल्या रुग्णांनाही आता हे औषध देता येईल. कंपनीने म्हटले आहे, की 'भारतातील कोरोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोविफॉरची परवानगी गेम चेंजर ठरू शकते.
नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या आणखी एका औषधाला मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात हेटेरो (Hetero) या फार्मा कंपनीने रविवारी माहिती दिली. कंपनीने म्हटले आहे, की आम्ही कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी इनव्हेस्टिगेशनल अॅन्टीव्हायरल ड्रग रेमडेसिवीर (Remdesivir) लॉन्च करत आहोत. यासाठी कंपनीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय)ची परवानगीही मिळाली आहे. हे औषध भारतात 'कोविफॉर' (Covifor) नावाने विकले जाईल.
यापूर्वी नुकतीच ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीला कोरोनावरील उपचारांसाठी फेविपिरावीरचे (favipiravir) जेनेरिक व्हर्जन लॉन्च करण्याची परवानगी मिळाली आहे. ग्लेनमार्कने फॅबिफ्लू (FabiFlu) नावाने हे औषध बाजारात आणले आहे.
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण
'गेम चेंजर ठरेल हे औषध' -
कंपनीने दावा केला आहे, की डीजीसीआयने कोविड-19चे संभ्याव्य लोक तसेच संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी या औषधाचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. गंभीर असलेल्या रुग्णांनाही आता हे औषध देता येईल. कंपनीने म्हटले आहे, की 'भारतातील कोरोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोविफॉरची परवानगी गेम चेंजर ठरू शकते. कारण या औषधाचे क्लिनिकल परिणाम पॉझिटिव्ह आले आहेत.' देशातील रुग्णांपर्यंत हे औषध लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा दावाही हेटेरोने केला आहे.
CoronaVirus News: कोरोनाचं 'हे' रूप इतर Covid-19च्या रुपापेक्षा 10 पट घातक, देण्यात आलं असं नाव
100mgच्या इंजेक्शनमध्ये येणार औषध -
कोविफॉर Covifor हे औषध 100mg इंजेक्शनमध्ये उपलब्ध होईल. तसेच ते डॉक्टर अथवा आरोग्य कर्मचाऱ्याच्या देखरेखीखालीच घ्यावे लागेल. या औषधासाठी कंपनीने अमेरिकेच्या 'गिलियड सायन्सेस इंक'सोबत (Gilead Sciences Inc) करार केला आहे. हेटेरो ग्रुप ऑफ कंपनीजचे चेयरमन म्हणाले, सध्याची गरज लक्षात घेता, आवश्यक स्टॉक देण्यासाठी कंपनी तयार आहे.
फेविपिरावीरही बाजारात -
क्लिनिकल चाचणीत फॅबिफ्लूने कोरोना व्हायरसच्या सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांवर चांगला परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. हे औषध कोरोनावरील उपचारासाठी चांगला पर्याय आहे. कंपनी सरकार आणि आरोग्य समुदायासोबत एकत्रितपणे काम करणार आहे. त्यामुळे देशभरात रुग्णांना हे औषध सहज उपलब्ध होऊ शकेल. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १०३ रुपये प्रति टॅबलेट या किंमतीत बाजारात उपलब्ध होईल.