Corona Virus : कोरोना व्हेरिएंटच्या अफवांकडे लक्ष देऊ नका, ABCD चे पालन करा; सरकारचा लोकांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 12:03 PM2021-07-13T12:03:00+5:302021-07-13T12:04:02+5:30
Corona Virus : कोरोना व्हायरसच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंटबाबतच्या अफवांकडे लक्ष देऊ नका. कोरोना व्हायरसविरूद्ध मूलभूत प्रोटोकॉलकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
नवी दिल्ली : देशासह जगभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर अद्याप सुरूच आहे. आता कोरोना व्हायरचा नवीन व्हेरिएंट समोर आल्याने लोकांची आणि सरकारची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत लोकांमध्ये अफवा पसरवू नये म्हणून केंद्र सरकारने लोकांसाठी आवाहन केले आहे. कोरोना व्हायरसच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंटबाबतच्या अफवांकडे लक्ष देऊ नका. कोरोना व्हायरसविरूद्ध मूलभूत प्रोटोकॉलकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपल्या ट्विटर कोविड-19 हँडलवरून यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यामध्ये लोकांना सांगितले गेले आहे की, ' कोरोना व्हायरसच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंट संबंधित असलेल्या अफवाकडे दुर्लक्ष करा, त्याऐवजी कोरोना व्हायरच्या महामारीविरोधात एबीसीडी नियमांचे पालन करा.'
#IndiaFightsCorona:
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) July 12, 2021
📍Do NOT believe in rumours about any coronavirus variant - Alpha, Beta, Gamma, or Delta.
➡️Follow A-B-C-D of the fight against infodemic:
✅A: Advise
✅B: Believe
✅C: Cross-check
✅D: Do NOT promote fear#Unite2FightCorona#StaySafe#We4Vaccinepic.twitter.com/7PnaeJUBRx
मंत्रालयाने एबीसीडीचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार, ए म्हणजे - एडव्हाइज किंवा सल्ला, बी म्हणजे बिलिव्ह किंवा विश्वास, सी म्हणजे - क्रॉस चेक, याचच अर्थ कोणत्याही माहितीची पुन्हा पडताळणी करणे आणि डी म्हणजे डू नॉट प्रमोट म्हणजेच भितीचे वातावरण पसरू नका. यासह, मंत्रालयाने एका ग्राफिक्सद्वारे काही सूचना शेअर केल्या आहेत. हे कोरोना संकट काळात लोकांना खूप मदत करू शकते.
जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीमुळे अर्धांगवायूचा धोका, #FDA कडून इशारा https://t.co/msLVEr3AC5#CoronaVaccine
— Lokmat (@MiLOKMAT) July 13, 2021
मोदींचे अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन
यापूर्वी 27 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लोकांना कोरोना व्हायरसबाबच्या अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. कोरोना व्हायरस जागतिक महामारी संपली आहे, हे समजून घेण्याची चूक करू नये असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिला होता. कोरोना व्हायरस आपले स्वरुप बदलतो, म्हणूनच याला रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोरोना व्हायरसशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन करणे आणि लसीकरण करणे आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. तसेच, लोकांचा गोंधळ होऊ नये आणि अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले होते.