Corona Virus : जन्मलेल्या जुळ्या बाळांना कोरोनाची बाधा, रुग्णालयात उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 08:30 AM2021-04-02T08:30:42+5:302021-04-02T08:47:02+5:30
Corona Virus : देशभरात ४५ वर्षे वयाच्या पुढील लोकांना लस देण्यास सुरुवात झाली असली तरी युवकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होऊन ते ‘सुपर स्प्रेडर’ बनत असल्याने सरसकट सर्वांनाच लस देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
वडोदरा - देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यात शून्य ते १० वर्षे वयाच्या २०,१७१ मुलांना, तर ११ ते २० वर्षे वयोगटातील ५३,३६५ मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातच, गुजरातच्यावडोदरा येथे जन्मजात जुळ्या बाळांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. एसएसजी रुग्णालयातील पीडियाट्रीक विभागाच्या प्रमुखांनी यांसदर्भात माहिती दिली.
देशभरात ४५ वर्षे वयाच्या पुढील लोकांना लस देण्यास सुरुवात झाली असली तरी युवकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होऊन ते ‘सुपर स्प्रेडर’ बनत असल्याने सरसकट सर्वांनाच लस देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकीकडे लसीकरण जोरात सुरु असताना, दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. महाराष्ट्रात ० ते २० वर्षे वयातील ७३,५३६ मुले तीन महिन्यात बाधित झाली आहेत. कोरोनाचा सर्वात जास्त फटका ३१ ते ४० वर्षे वयोगटातील तरुणांना बसला आहे. या वयोगटातील १,७७,७६९ जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. गुजरातध्ये जन्मजात जुळ्या बाळांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात माहिती देताना डॉ. अय्यर म्हणाल्या की, या लहान बाळांमध्ये दस्त आणि पाण्याच कमतरता असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी, दोन्ही बाळांच कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये, दोघांचाही अहवाल पॉझिटीव्ह आढळून आला आहे.
Gujarat: Newborn twins tested positive for #COVID19 in Vadodara
— ANI (@ANI) April 2, 2021
"Twins were brought in 15 days after being born with severe diarrhoea & dehydration. They tested positive but are better now. Haven't been discharged yet," said Dr Iyer, Head Dept of Pediatrics, SSG Hospital (01.04) pic.twitter.com/vvg1Mzl6U7
या बाळांचा जन्म झाल्यानंतर 15 दिवसांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्यापही त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचंही डॉ. अय्यर यांनी सांगितलं.
वडोदऱ्यातही रात्रीची संचारबंदी
गुजरातमध्येही वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन, अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोट येथे रात्रीची संचारबंदी 15 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. मंगळवारी राज्यात कोरोना वायरसमुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यातील हा सर्वात मोठा आकडा आहे. राज्यात आत्तापर्यंत 4,510 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत एकूण 12,263 एक्टीव्ह रुग्ण असून 147 जणांची प्रकृती गंभीर आहे.