Corona Virus : दिलासादायक : सात महिन्यांत कोरोनाचे सर्वात कमी नवे रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 07:13 AM2021-10-27T07:13:49+5:302021-10-27T07:14:23+5:30

Corona Virus : देशात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता ४,५५,०६८ झाली आहे. सलग ३१ दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांच्या आत आहे तर एकूण बाधितांच्या संख्येत उपचाराधीन रुग्णांची संख्या ०.४९ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के आहे. 

Corona Virus: The lowest number of new corona patients in seven months | Corona Virus : दिलासादायक : सात महिन्यांत कोरोनाचे सर्वात कमी नवे रुग्ण 

Corona Virus : दिलासादायक : सात महिन्यांत कोरोनाचे सर्वात कमी नवे रुग्ण 

Next

नवी दिल्ली : देशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे १२,४२८ रुग्ण आढळले तर ३५६ जणांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांची संख्या गेल्या २३८ दिवसांतील सगळ्यात कमी आहे तर उपचाराधीन रुग्णांची संख्या १,६३,८१६ आहे. सातत्याने रुग्णसंख्या घटत असल्याने देशासाठी ही बाब मोठा दिलासा देणारी आहे. 
देशात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता ४,५५,०६८ झाली आहे. सलग ३१ दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांच्या आत आहे तर एकूण बाधितांच्या संख्येत उपचाराधीन रुग्णांची संख्या ०.४९ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के आहे. 
नव्या रुग्णांचे प्रमाण मार्च, २०२० पासून सगळ्यात कमी तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (९८.१८) हे सर्वात जास्त आहे. गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांत ३,८७९ ने घट झाली. सोमवारी ११,३१,८२६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत १०२.९४ कोटी लस मात्रा दिल्या गेल्या आहेत, असेही म्हटले आहे.

Web Title: Corona Virus: The lowest number of new corona patients in seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.