CoronaVirus : आता बायोकॉन आणणार कोरोना रुग्णांसाठी औषध, किंमत बघून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 12:54 PM2020-07-14T12:54:53+5:302020-07-14T12:58:32+5:30

बायोकॉनने यापूर्वी म्हटले होते, की इटोलिझुमाब जगात स्वीकार झालेला पहिला नोव्हेल बायोलॉजिकल उपचार आहे. याच्या सहाय्याने कोविड​​-१९ च्या गंभीर रुग्णावर उपचार केला जातो. 

Corona Virus Medicine biocon to launch drug for Corona virus patients priced at rs 8000 per vial | CoronaVirus : आता बायोकॉन आणणार कोरोना रुग्णांसाठी औषध, किंमत बघून व्हाल हैराण

CoronaVirus : आता बायोकॉन आणणार कोरोना रुग्णांसाठी औषध, किंमत बघून व्हाल हैराण

googlenewsNext
ठळक मुद्देया बायोलॉजिक औषधाचे नाव इटोलिझुमाब असे आहे.बायोकॉनने यापूर्वी म्हटले होते, की इटोलिझुमाब जगात स्वीकार झालेला पहिला नोव्हेल बायोलॉजिकल उपचार आहे.भारतात ३ लाखहून अधिक लोक संक्रमित

नवी दिल्ली : कोरोनाच्या मध्यम आणि गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी आता बायोकॉन नावाची कंपनी एक औषध घेऊन येत आहे. या बायोलॉजिक औषधाचे नाव इटोलिझुमाब असे आहे. त्याची किंमत साधारणपणे ८,००० रुपये प्रति बाटली एवढी असेल, अशी माहिती कंपनीने सोमवारी दिली.

कंपनीने म्हटले आहे, की कोविड-१९ मुळे मध्यम अथवा गंभीर अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (एआरडीएस) प्रकरणात, सायटोकाइन रिलीज सिंड्रोमच्या उपचारासाठी भारतात आणीबाणीजन्य परिस्थितीत वापरासाठी, इटोलिझुमाब इंजक्शन (25 मिग्रा/पाच मिली लीटर)च्या विक्रिला भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय)कडून मुंजुरी मिळाली आहे. 

बायोकॉनने यापूर्वी म्हटले होते, की इटोलिझुमाब जगात स्वीकार झालेला पहिला नोव्हेल बायोलॉजिकल उपचार आहे. याच्या सहाय्याने कोविड​​-१९ च्या गंभीर रुग्णावर उपचार केला जातो. 

बायोकॉनचे कार्यकारी अध्यक्ष किरण मजदार-शॉ म्हणाले, जोवर व्हॅक्सीन उपलब्ध होत नाही, तोवर आपल्याला अशा जीव वाचविणाऱ्या औषधांची आवश्यकता असते. आपल्याला भलेही या वर्षाच्या अखेरपर्यंत अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत लस मिळो, पण, पुन्हा कोरनाचे संक्रमण होणार नाही, याची शाश्वती देता येत नाही. आपण ज्या पद्धतीने ही लस काम करेल, अशी आशा करत आहोत, ती त्याच पद्धतीने काम करेल याचीही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे आपल्याला तयार राहण्याची आवश्यकता आहे.

भारतात ३ लाखहून अधिक लोक संक्रमित -
देशात एकाच दिवसात कोरोनाचे २८,७०१ नवे रुग्ण आढळून आले असून ही विक्रमी वाढ आहे. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ८ लाख ७८ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांत आणखी ५०० जण या आजाराने मरण पावल्याने एकूण बळींची संख्या २३,१७४ झाली आहे. कोरोनाच्या आजारातून उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या ५,५३,४७० इतकी झाली आहे. तर ३,०१,६०९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६३.०१ टक्के आहे.

इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी देशभरात कोरोनाच्या २१९१०३ चाचण्या पार पडल्या. त्यामुळे या दिवसापर्यंत राष्ट्रीय स्तरावर कोरोनाच्या चाचण्यांची एकूण संख्या १,१८,०६,२५६ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

सचिन पायलटांची खेळी फेल? अशोक गेहलोतांचे माध्यमांसमोर शक्तीप्रदर्शन

CoronaVirus : खूशखबर! कोरोना व्हॅक्‍सीनवर रशियानं मारली 'बाजी'; सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा, सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वी

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

Read in English

Web Title: Corona Virus Medicine biocon to launch drug for Corona virus patients priced at rs 8000 per vial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.