Corona Virus : "कधीच संपणार नाही कोरोना; बूस्टर डोस घेणाऱ्यांनाही संसर्गाचा धोका", तज्ज्ञांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 01:31 PM2023-04-18T13:31:05+5:302023-04-18T13:39:24+5:30

Corona Virus : कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, अनेक तज्ञ लोकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देत आहेत.

Corona Virus new variant symptoms booster dose of vaccine can do more harm than good aiims doctor warns | Corona Virus : "कधीच संपणार नाही कोरोना; बूस्टर डोस घेणाऱ्यांनाही संसर्गाचा धोका", तज्ज्ञांचा मोठा खुलासा

Corona Virus : "कधीच संपणार नाही कोरोना; बूस्टर डोस घेणाऱ्यांनाही संसर्गाचा धोका", तज्ज्ञांचा मोठा खुलासा

googlenewsNext

देशात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, आरोग्य विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा आणि जीनोम सिक्वेन्सिंगचा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, अनेक तज्ञ लोकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देत आहेत. परंतु काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना लस तुम्हाला 100 टक्के संरक्षण देऊ शकत नाही. बूस्टर डोस घेतला असेल तरी संसर्ग होण्याची शक्यता असते.

रूबी हॉल क्लिनिकचे कंसल्टेंट फिजिशियन डॉ. अभिजीत एम देशमुख एका मुलाखतीदरम्यान म्हणाले, "आपल्याला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की कोरोनाविरूद्धच्या अनेक लसी कोणालाही 100 टक्के संरक्षण देत नाहीत. बूस्टर डोस घेतला तरीही नाही." दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधील कम्युनिटी मेडिसिनचे प्रोफेसर डॉ. संजय राय म्हणतात, "यावेळी लसीचा बूस्टर डोस फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतो."

लस ​​कोरोनाची नवीन लाट थांबवू शकत नाही

"सुरुवातीला, जेव्हा जास्त लोकांना संसर्ग झाला नव्हता, तेव्हा हर्ड इम्युनिटी नव्हती आणि रोगाची तीव्रता आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी लस आवश्यक होती. पण आता देशातील जवळपास सर्व लोकांना संसर्ग झाला आहे आणि त्यांच्यामध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती देखील विकसित झाली आहे, जी कोणत्याही विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी लसीपेक्षा अधिक प्रभावी आहे." डॉ. संजय म्हणाले, "लस ​​कोरोनाची कोणतीही नवीन लाट थांबवू शकत नाही, ती केवळ मृत्यूची संख्या आणि रोगाची तीव्रता कमी करू शकते."

लसीकरण झालेल्यांनाही होऊ शकतो संसर्ग 

भारतीय SARS-Cov-2 Genomics Consortium (INSACOG), भारत सरकारने स्थापन केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेच्या एक मेंबरने काही काळापूर्वी म्हटलं की, "भारतातील कोरोनाच्या नवीन प्रकरणांचे नमुने दर्शवतात की, Omicron sub-variant XBB.1.16 हा कोरोना मृत्यू आणि हॉस्पिटलायझेशनसाठी जबाबदार आहे. एकूण प्रकरणांपैकी बहुतेक प्रकरणे XBB व्हेरिएंटच्या वेगवेगळ्या सब व्हेरिएंटची आहेत. या सर्व केसेस ब्रेकथ्रू इन्फेक्शन आहेत, म्हणजेच ज्या लोकांनी लसीचा बूस्टर डोस घेतला आहे त्यांना देखील संसर्ग होत आहे. दोन डोस घेतले की तीन काही फरक पडत नाही. हा प्रकार लसीकरण केलेल्या लोकांना देखील संक्रमित करू शकतो." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Corona Virus new variant symptoms booster dose of vaccine can do more harm than good aiims doctor warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.