Omicron Positive झाल्यानंतर किती दिवसांचा Quarantine आवश्यक? नीती आयोगाच्या आरोग्य तज्ज्ञांनीच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 05:18 PM2022-01-02T17:18:39+5:302022-01-02T17:22:03+5:30
केंब्रिज विद्यापीठाने भारतात दुसऱ्या लाटेचा अचूक अंदाज वर्तवला होता. त्यामुळे, भारतासाठी तिसऱ्या लाटेचा इशाराही धोक्याचा ठरू शकतो.
कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराने, संपूर्ण जगाचेच टेन्शन वाढवले आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. मात्र प्रश्न असा आहे, की परदेशातून याणाऱ्या कुण्या भारतीय अथवा परदेशी व्यक्तीस ओमिक्रोनचा संसर्ग आढळून आल्यास, येथील आयसोलेशन अथवा क्वारंटाइनचा जो प्रोटोकॉल आहे तो कशा प्रकारचा आहे आणि तो डेल्टा व्हायरस सारखाच असेल की काहीसा वेगळा असेल?
यासंदर्भात बोलताना NITI आयोगाचे आरोग्य तज्ज्ञ डॉ. व्ही.के. पॉल यांनी म्हटले आहे, की जर एखाद्याने ओमायक्रॉनची चाचणी केली असेल, तर त्याने रिपोर्ट येईपर्यंत होम क्वारंटाईनमध्येच रहावे. तसेच, एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला असेल तर त्याने 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा आणि रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच लोकांमध्ये जावे.
भारतात ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेसमध्ये तिसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जाते. अशा वेळी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा धोका वाढवू शकतो. केंब्रिज विद्यापीठाने भारतात दुसऱ्या लाटेचा अचूक अंदाज वर्तवला होता. त्यामुळे, भारतासाठी तिसऱ्या लाटेचा इशाराही धोक्याचा ठरू शकतो.
कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा समोर आला आहे. देशातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 1,525 वर पोहोचली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (2 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 27,553 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,81,770 वर पोहोचला आहे.