Omicron Variant : ओमिक्रॉन, ओमायक्रॉन, ओमीक्रोन की आणखी काही? Omicron चा खरा उच्चार काय? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 05:33 PM2022-01-06T17:33:51+5:302022-01-06T17:34:18+5:30
Omicron हेच नाव का? - जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निश्चित केले होते, की या कोरोना व्हेरिअंटचे नाव एखाद्या देशाच्या नावावरून न ठेवता ग्रीक अल्फाबेट्सनुसार ठेवण्यात येईल.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा नवा व्हेरिअंट Omicron ने अर्ध्याहून अधिक जगाला विळखा घातला आहे. भारतातही या व्हेरिअंटचे 2,600 हून अधिक रुग्ण समोर आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून Omicron हा शब्द लोक सातत्याने ऐकत आहेत. पण या शब्दाचा योग्य उच्चार अनेकांना माहीत नाही. ग्रीक भाषेतील या अक्षराच्या उच्चारासंदर्भात तज्ज्ञांचेही एक मत नाही. तर जाणून घ्या, Omicron चा नेमका उच्चार करायचा कसा.
Omicron चा उच्चार नेमका कसा? -
Merriam Webster नुसार, Omicron चा उच्चार 'ओमक्रॉन', असा होतो. यात सर्वप्रथम सिलॅबलवर जोर दिला आहे. मात्र, गूगल सिस्टिम याला भारतीय इंग्रजीमध्ये 'ओमायक्रॉन' सांगते. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सनही याचा असाच उच्चार करतात. ब्रिटिश इंग्रजित याला 'ओमिक्रॉन' म्हटले जाते आणि अमेरिकन इंग्रजीनुसारही 'आमिक्रॉन' म्हटले जाते.
एक उच्चार 'ओमीक्रोन' असाही आहे. पण तो तेवढा प्रचारात नाही. न्यू ऑक्सफर्ड डिक्शनरी नुसार, याचा उच्चार 'ओमायक्रॉन' असायला हवा. भौगोलिक दृष्ट्या वेगवेगळ्या असलेल्या भागांत Omicron चा उच्चार वेगवेगळा आहे.
Omicron हेच नाव का?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निश्चित केले होते, की या कोरोना व्हेरिअंटचे नाव एखाद्या देशाच्या नावावरून न ठेवता ग्रीक अल्फाबेट्सनुसार ठेवण्यात येईल. आतापर्यंतच्या सर्वच व्हेरिअंट्सना याच पद्धतीने नाव देण्यात आले होते. पण Omicron च्या बाबतीत असे झाले नाही. नियमाप्रमाणे, B.1.1.529 चे नाव Xi असे असायला हवे होते. कारण यापूर्वीच्या व्हेरिअंटचे नाव Mu असे होते.
यापूर्वी, कोविड प्रकारांना 'अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, एपसाइलन, जीटा, ईटा, शीटा, ओटा, कप्पा, लॅम्बडा, मू' अशी नावे देण्यात आली होते. गेल्या डिसेंबर महिन्यात या नव्या व्हेरिअंटला 'व्हेरिअंट ऑफ कन्सर्न' घोषित करत WHO ने Omicron नाव दिले. यासंदर्भात, WHO ने सांगितले होते, की एखाद्या भागाकडे वाईट पद्धतीने बघितले जाऊ नये, म्हणून आपण Nu आणि Xi नाव दिले नाही.