पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 09:01 AM2020-05-10T09:01:34+5:302020-05-10T09:16:12+5:30

जेव्हा भारताने पीओके, गिलगिट-बाल्टिस्तानच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली, तेव्हापासूनच पाकिस्तान दहशतीखाली आहे.

corona virus pakistan kashmir india weather department pok gilgit baltistan vrd | पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाली

पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाली

googlenewsNext
ठळक मुद्देजगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरलेला असून, भारतही अनेक देशांना या संकटकाळात मदत करतो आहे. एखाद्या देशाला औषधाची आवश्यकता असल्यास भारत तातडीनं ती उपलब्ध करून देत आहे. जेव्हा भारताने पीओके, गिलगिट-बाल्टिस्तानच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली, तेव्हापासूनच पाकिस्तान दहशतीखाली आहे.

नवी दिल्लीः जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरलेला असून, भारतही अनेक देशांना या संकटकाळात मदत करतो आहे. एखाद्या देशाला औषधाची आवश्यकता असल्यास भारत तातडीनं ती उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पण याचदरम्यान पाकिस्तान हा भारताविरोधात गरळ ओकण्याचं काम करत आहे. भारत पुन्हा आमच्यावर सर्जिकल स्ट्राइक करेल, असा कांगावा पाकिस्तानकडून सुरू आहे. जेव्हा भारताने पीओके, गिलगिट-बाल्टिस्तानच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली, तेव्हापासूनच पाकिस्तान दहशतीखाली आहे.

भारतानं पीओके, गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशाच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. पीओके (पाकिस्तान व्याप्त काश्मीर) फक्त आमचे आहे, तिथले हवामानही आम्हीच वर्तवणार आहोत, असंही भारतानं पाकिस्तानला ठणकावलं आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळातही मोदींनी जम्मू-काश्मीरबद्दल भूमिका बदललेली नसून, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवण्यासाठी प्लॅनही तयार केला आहे. 

कोरोना व्हायरसच्या युगातही पाकिस्तानला उत्तर देण्याची पंतप्रधान मोदींची मनस्थिती अजूनही तशीच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीची काही देशांच्या परिषदेत पंतप्रधानांनी दहशतवादाचा उल्लेख करत पाकिस्तानवर निशाणा साधला होता. काही लोक प्राणघातक विषाणू, खोट्या बातम्या अन् व्हिडिओ पसरविण्यात गुंतले आहेत, असंही मोदी म्हणाले होते. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताने पाकिस्तानला मदतीचा हात दिला होता. परंतु पाकिस्तानकडून दहशतवादी कृत्ये सुरूच असल्यानं मोदी सरकारनं त्यांना शेवटचा इशारा दिला आहे. पीओकेसमवेत काश्मीरचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला आता गिलगिट-बाल्टिस्तानवरही पाणी सोडावे लागणार असल्याची चर्चा आहे. 

भारत आपल्यावर सर्जिकल स्ट्राइक करतो की काय, अशी भीती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वाटू लागली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पाकिस्तानविरोधात प्रॉक्सी युद्ध (सर्जिकल स्ट्राइक) सुरू होण्याची भीती आहे, असे ट्विट करत इम्रान खान यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. इम्रान खान यांनी ट्विटरवर लिहिलं होते की, " भारतामुळे दक्षिण आशियातील शांतता आणि सुरक्षा धोक्यात येण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे लक्ष देऊन कारवाई केली पाहिजे. काश्मीरमध्ये अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना इम्रान खान यांनी स्थानिक घटना असल्याचं म्हटलं आहे. त्यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतीय हवामान खात्याने पाकिस्तानला इशारा दिला 
भारतीय हवामान खात्याने जम्मू-काश्मीरच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला. त्याचबरोबर हवामान खात्याने जम्मू-काश्मीरच्या हवामान उपविभागाचा आकारही बदलला. उपविभागामध्ये जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादला स्थान देण्यात आले आहे. भारताने पाकव्याप्त  काश्मीरवरचा आपला दावा कधीही सोडलेला नव्हता. आता भारतानं उचललेली ही पावलं पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे. हवामान खात्याने पीओकेसह गिलगिट-बाल्टिस्तानच्या हवामानाचा इशारा देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानला निवडणुका घेण्यास परवानगी दिली होती. तेव्हा भारताने पाकिस्तानला स्पष्ट सांगितले होते की, हा पीओकेदेखील आमचा आहे आणि शक्य तितक्या लवकर तो रिकामा करावा. ज्या दिवशी भारताचे सैन्य पीओकेला पोहोचेल, तेव्हा काय होईल, अशी भीती आता पाकिस्तानला सतावते आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: कोरोनावर लस तयार करण्याच्या भारत फक्त एक पाऊल दूर; प्राण्यांवर होणार ट्रायल

CoronaVirus News : धक्कादायक! जळगावात आणखी ११ कोरोनाबाधित रुग्ण सापडले

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी

CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका

Web Title: corona virus pakistan kashmir india weather department pok gilgit baltistan vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.