कोरोना विषाणूला रोखणारे मिनीप्रोटीन केले तयार, बंगळुरू येथील आयआयएससीचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 05:46 AM2022-06-08T05:46:03+5:302022-06-08T06:57:43+5:30

Corona virus : या लेखामध्ये म्हटले आहे की, हे मिनीप्रोटीन विषाणूंना एकत्र बांधून ठेवते. त्यामुळे त्यांची संक्रमणाची क्षमता कमी होते. अमिनो आम्लाच्या छोट्या साखळीला पेप्टाइड म्हणतात. अशी अनेक पेप्टाइड मिळून प्रोटीन तयार होते. 

Corona virus-preventing miniprotein prepared, research by IISC, Bangalore | कोरोना विषाणूला रोखणारे मिनीप्रोटीन केले तयार, बंगळुरू येथील आयआयएससीचे संशोधन

कोरोना विषाणूला रोखणारे मिनीप्रोटीन केले तयार, बंगळुरू येथील आयआयएससीचे संशोधन

Next

बंगळुरू : कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी), बंगळुरू येथील शास्त्रज्ञांनी एक नवे कृत्रिम पेप्टाइड किंवा मिनीप्रोटीन तयार केले आहे. हे मिनीप्रोटीन कोरोनाच्या विषाणूंना पेशी शिरण्यापासून मज्जाव करते. या संशोधनावर आधारित लेख नेचर ऑफ बायोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
या लेखामध्ये म्हटले आहे की, हे मिनीप्रोटीन विषाणूंना एकत्र बांधून ठेवते. त्यामुळे त्यांची संक्रमणाची क्षमता कमी होते. अमिनो आम्लाच्या छोट्या साखळीला पेप्टाइड म्हणतात. अशी अनेक पेप्टाइड मिळून प्रोटीन तयार होते. 
प्रोटीन व पेप्टाइडच्या आकारातही फरक असतो. प्रोटीनची प्रोटीनशी होणारी क्रिया ही कुलूप व चावीप्रमाणे असते. या प्रकियेला प्रयोगशाळेत बनविलेल्या मिनी प्रोटीनद्वारे 
रोखता येते. परिणामी कोविड-१९ विषाणूला पेशींमध्ये शिरण्यापासून मज्जाव होतोच, शिवाय त्याची संसर्गक्षमताही मोठ्या प्रमाणावर कमी होते.
कोरोना विषाणूंमध्ये सातत्याने परिवर्तन होत असते. त्यामुळे त्यांचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याच दृष्टीने आयआयएससी, बंगळुरूचे शास्त्रज्ञ आणखी सखोल संशोधन नजीकच्या काळात करणार आहेत. (वृत्तसंस्था)

विषाणू, प्रथिनांमधील क्रियेचा अभ्यास
आयआयएससी, बंगळुरू येथील मॉलिक्यूलर बायोफिजिक्स विभागातील साहाय्यक प्राध्यापक जयंत चॅटर्जी यांनी सांगितले की, विषाणू व प्रथिनांमध्ये होणाऱ्या क्रियेचा अभ्यास करण्यासाठी एसआयएच-५ हे मिनीप्रोटिन 
वापरण्यात आले. ते विषाणूंना पेशीमध्ये शिरकाव करण्यापासून रोखते असे प्रयोगात सिद्ध झाले.
 

Web Title: Corona virus-preventing miniprotein prepared, research by IISC, Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.