पुढील 20 दिवसांत येऊ शकतो कोरोनाचा पीक! चौथी लाट येणार का? जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 12:14 AM2023-04-08T00:14:56+5:302023-04-08T00:15:38+5:30
देशात शुक्रवारी 6000 हून अधिक नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. पुढील 20 दिवसांत कोरोना बाधितांची संख्या पीकवर असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नवी दिल्ली - भारतात कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असून देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यानंतर सर्वाधिक दैनंदिन नोंद होताना दिसत आहे. देशात शुक्रवारी 6000 हून अधिक नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. पुढील 20 दिवसांत कोरोना बाधितांची संख्या पीकवर असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, सध्या चौथ्या लाटेची शक्यता नाकारली जात आहे.
कोरोना तज्ज्ञ डॉ. रघुविंदर पाराशर इंडिया टुडेसोबत बोलताना म्हणाले, गेल्या लाटेदरम्यानच्या आणि आताच्या व्हायरस पॅटर्नमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. कारण याची व्हयरस समजून घेण्यासाठी आणि त्याचे संक्रमण रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात मदत होऊ शकते. मागील ट्रेंडनुसार, पीक 15 ते 20 दिवसांदरम्यान असायला हवा आणि यानंतर संख्या कमी होण्याची आशा आहे.
अशी आहे महाराष्ट्राची स्थिती -
महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 926 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. चिंतादायक बाब म्हणजे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 4,487 एवढी झाली आहे.