Corona virus : धक्कादायक ! सरकारी रुग्णालयातून रेमेडीसीवीर इंजेक्शनचे 850 डोस चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 04:08 PM2021-04-17T16:08:02+5:302021-04-17T16:09:29+5:30

Corona virus : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचं समोर येत आहे.

Corona virus : Shocking! 850 doses of remedicivir injection stolen from government hospital | Corona virus : धक्कादायक ! सरकारी रुग्णालयातून रेमेडीसीवीर इंजेक्शनचे 850 डोस चोरीला

Corona virus : धक्कादायक ! सरकारी रुग्णालयातून रेमेडीसीवीर इंजेक्शनचे 850 डोस चोरीला

Next
ठळक मुद्देपुण्यात शुक्रवारी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केले. तर, नागपूरात रेमडिसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई - रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असताना आता या इंजेक्शनची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोपाळमधील एका सरकारी रुग्णालयातून रेमेडिसीवीर इंजेक्शनचे तब्बल 850 डोस चोरी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. देभरात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येत आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेन वेगाने पसरत आहे. त्यामुळे, वैद्यकीय यंत्रणा कोलमडून पडली आहे. तर, ऑक्सिजन बेडसह, रेमडिसीवीरचाही तुटवडा जाणवत आहे. 

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचं समोर येत आहे. पुण्यात शुक्रवारी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केले. तर, नागपूरात रेमडिसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातच, आता मध्य प्रदेशच्या भोपाळमधील हमीदी या सरकारी रुग्णालयातून रेमडिसीव्हीरच इंजेक्शनची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. 

हमीदीया रुग्णालयात मुबलक असलेल्या रेमडिसीव्हीर इंजेक्शनचा काही दिवसांपूर्वीच आला होता. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने रेमडिसीव्हीर इंजेक्शनची मागणी वाढली असून मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच, चोरट्यांनी रुग्णालयातील रेमेडिसीवीर इंजेक्शनच्या बॉक्सवरच डल्ला मारला आहे. औषध असलेल्या खोलीची खिडकी तोडून हे इंजेक्शन लंपास करण्यात आले आहेत. या चोरट्यांना रुग्णालयातील स्टाफनेच मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी, कोहेफिजा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. राज्यात आत्तापर्यत 42 हजार इंजेक्शनचा पूर्तता झाल्याचं मध्य प्रदेश सरकारने म्हटले आहे. सरकारने 50 इंजेक्शनची ऑर्डर दिली असून 9,788 इंजेक्शनचा पुरवठा आजच करण्यात येणार आहे. उर्वरीत इंजेक्शन पुढील 3 दिवसांत येतील, असेही सांगण्यात आले. दरम्यान, रेमडेसीवीर इंजेक्शनची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

मंत्री नवाब मलिक यांचा गंभीर आरोप 

राज्यात अशी बिकट परिस्थिती असताना मंत्री नवाब मलिकांनी खळबळजनक दावा करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री नवाब मलिकांनी ट्विट करत म्हंटलय की, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारलं असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधं पुरवू नका असं सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे. जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
 

Read in English

Web Title: Corona virus : Shocking! 850 doses of remedicivir injection stolen from government hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.