Corona Virus: ... तर दिल्लीत लॉकडाऊन लावणार नाही, अरविंद केजरीवालांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 09:30 PM2022-01-09T21:30:57+5:302022-01-09T21:31:27+5:30

Corona Virus: दिल्लीत 5 जानेवारी रोजी 5 हजार रुग्ण आढळून आले होते. आता, शनिवारी हीच रुग्णसंख्या 24 तासांत 20 हजारांवर पोहोचली आहे. तर, आज 22 हजार रुग्णसंख्या असेल, असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले.

Corona Virus: ... so lockdown will not be imposed, Arvind Kejriwal made it clear | Corona Virus: ... तर दिल्लीत लॉकडाऊन लावणार नाही, अरविंद केजरीवालांनी स्पष्टच सांगितलं

Corona Virus: ... तर दिल्लीत लॉकडाऊन लावणार नाही, अरविंद केजरीवालांनी स्पष्टच सांगितलं

Next

नवी दिल्ली - देशभरात कोरोनामुळे अनेक राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असून अनेक कडक निर्बंध लागू झाले आहेत. राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात काल 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. तर आज रविवारी 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. राजधानी दिल्लीतही रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 

दिल्लीत 5 जानेवारी रोजी 5 हजार रुग्ण आढळून आले होते. आता, शनिवारी हीच रुग्णसंख्या 24 तासांत 20 हजारांवर पोहोचली आहे. तर, आज 22 हजार रुग्णसंख्या असेल, असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. मात्र, घाबरण्याचं कारण नाही, असे म्हणत केजरीवाल यांनी लॉकडाऊनसंदर्भातही स्पष्टपणे भूमिका मांडली. जर तुम्ही मास्क लावणार असाल तर मी लॉकडाऊन लावणार नाही. सध्या रुग्णालयात भरती करण्यात येणाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे घाबरुन जाऊ नका, असेही केजरीवाल यांनी म्हटले. 

मुंबईचा आजच्या रुग्णसंख्येचा विचार करता, एकट्या मुंबईत 19,474 कोरोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. ही रुग्णसंख्या गेल्या चोवीस तासांतील आहे. याशिवाय मुंबईत 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. (Maharashtra Mumbai Corona Virus Case updates) 

राज्यात 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू  -

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यादरम्यान 15 हजार 351 जण ठणठणीत होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यात 202259 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत
 

Web Title: Corona Virus: ... so lockdown will not be imposed, Arvind Kejriwal made it clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.