Corona virus : केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर कोरोना पॉझिटीव्ह, तर सरसंघचालकांना आजच डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 06:03 PM2021-04-16T18:03:37+5:302021-04-16T18:04:41+5:30
Corona virus : राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची बाधा झाली असून काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही कोरोनाची बाधा झाली होती.
नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे लसीकरण मोहीमत जोरदारपणे सुरू असताना, दुसरीकडे अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. जावडेकर यांनी स्व:ता याबाबत माहिती दिली.
राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची बाधा झाली असून काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर, त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या निगराणीखाली होते. आता, सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रकृती उत्तम असून त्यांना रुग्णालयातून आजच डिस्चार्ज देण्यात येत आहे. मात्र, पुढील काही दिवसांसाठी त्यांना घरीच क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
Team of attending doctors have decided to discharge RSS chief Mohan Bhagwat today with advice to remain in Home Quarantine for the next 5 days: Kingsway Hospitals, Nagpur
— ANI (@ANI) April 16, 2021
He tested positive for #COVID19 on April 9. pic.twitter.com/4h6FpESH5F
दरम्यान, दुसरीकडे भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: जावडेकर यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही जावडेकर यांनी केले आहे.
Union Minister Prakash Javadekar tests positive for #COVID19. pic.twitter.com/i9cltg9VE9
— ANI (@ANI) April 16, 2021