केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना कोरोनाचा संसर्ग, प्रकृती बिघडल्याने एम्समध्ये होणार उपचार

By बाळकृष्ण परब | Published: November 28, 2020 06:50 PM2020-11-28T18:50:57+5:302020-11-28T18:53:21+5:30

Sadhvi Niranjan Jyoti News : साध्वी निरंजन ज्योती यांना गेल्या चार दिवसांपासून ताप येत होता. दरम्यान, काल रात्री श्वास घेण्यात त्रास होऊ लागल्यानंतर साध्वी निरंजन ज्योती यांना कानपूरमधील हॅलट रुग्णालयात मेडिसन आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

corona virus : Union Minister Sadhvi Niranjan Jyoti infected with corona, Treatment will be in AIIMS | केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना कोरोनाचा संसर्ग, प्रकृती बिघडल्याने एम्समध्ये होणार उपचार

केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना कोरोनाचा संसर्ग, प्रकृती बिघडल्याने एम्समध्ये होणार उपचार

Next
ठळक मुद्देफुप्फुसामध्ये संसर्ग झाल्याने साध्वी निरंजन ज्योती यांना श्वास घेण्यास त्रास होत आहेसाध्वी निरंजन ज्योती यांच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहेकोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती ह्या आपल्या खासगी वाहनाने दिल्लीतील एम्स येथे उपचारांसाठी रवाना झाल्या आहेत

कानपूर - भाजपाच्या फायरब्रँड नेत्या आणि केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. श्वास घेण्यास त्रास होऊन त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अधिक उपचारांसाठी दिल्लीतील एम्समध्ये रवाना करण्यात आले आहे. साध्वी निरंजन ज्योती यांना गेल्या चार दिवसांपासून ताप येत होता. दरम्यान, काल रात्री श्वास घेण्यात त्रास होऊ लागल्यानंतर साध्वी निरंजन ज्योती यांना कानपूरमधील हॅलट रुग्णालयात मेडिसन आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार फुप्फुसामध्ये संसर्ग झाल्याने साध्वी निरंजन ज्योती यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता अँटिजन चाचणी निगेटिव्ह आली. मात्र ट्रूनॉट टेस्टमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते.

जीएमव्हीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्च आर.बी. कमल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती ह्या आपल्या खासगी वाहनाने दिल्लीतील एम्स येथे उपचारांसाठी रवाना झाल्या आहेत.

तत्पूर्वी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना छातीत दुखत असल्याने तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. मात्र त्यांना हृदयासंबंधीची कुठलीही समस्या नसल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर सीएमओमधील डॉक्टर अनिल मिश्रा यांनी केंद्रीय मंत्र्यांना घेऊन हॅलट रुग्णालयात पोहोचले तिथे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

साध्वी निरंजन ज्योती यांच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या २२ नोव्हेंबर रोजी दिल्लीमधून परतल्या होत्या. दिल्लीमधून आल्यापासून त्यांना सातत्याने ताप येत होता.

Web Title: corona virus : Union Minister Sadhvi Niranjan Jyoti infected with corona, Treatment will be in AIIMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.