Corona Virus : Omicron व्हेरिअंटबाबत वैज्ञानिकांचा मोठा इशारा, सर्वात धोकादायक असेल पुढचा महिना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 11:19 PM2021-12-20T23:19:00+5:302021-12-20T23:19:41+5:30
आतापर्यंत राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या या नव्या व्हेरिअंच्या 32 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, जगभरातील अनेक देशांत या व्हेरिअंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे.
देश आणि जगात ओमायक्रॉन व्हेरिअंट (Omicron Variant Cases) बाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आतापर्यंत भारतात (Omicron cases in India) ओमायक्रॉन व्हेरिअंटबाधितांची संख्या 161 वर पोहोचली आहे. (Omicron Cases)
याच बरोबर, आतापर्यंत राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या या नव्या व्हेरिअंच्या 32 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, जगभरातील अनेक देशांत या व्हेरिअंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे.
वॉशिंग्टन पोस्टच्या मते, डेन्मार्कमध्येही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कोरोनाच्या या व्हेरिअंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. हे पाहता डेन्मार्कच्या स्टेट सिरम इन्स्टिट्यूटने ओमिक्रॉन व्हेरिअंटसंदर्भात मोठा इशारा दिला आहे. नव्या प्रकरणांची सध्या केवळ सुरुवात असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
इन्स्टिट्यूटचे एपिडेमियोलॉजिस्ट टायरा ग्रोव्ह कुस यांनी म्हटले आहे, की येणारा पुढचा महिना सर्वात धोकादायक असेल. या व्हेरिअंटसंदर्भात अधिक माहिती उपलब्ध होणार नाही. डेनमार्क येथील रुग्णालयांत रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, अशी शक्यताही वक्त केली जात आहे.
Omicron is spreading significantly faster than the Delta variant in countries with documented community transmission, with a doubling time between 1.5–3 days https://t.co/tOu6iIvFZP#COVID19pic.twitter.com/s7AMCbJdwd
— World Health Organization (WHO) (@WHO) December 19, 2021
टायरा ग्रोव्ह कुस म्हणाले, डेन्मार्कमधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, लसीचे दोन डोस घेतलेले असोत अथवा एक, धोका सारखाच असेल. तथापि, ज्यांनी लसीचा बूस्टर डोस घेतला आहे. त्यांना कोरोना होण्याचा धोका कमी असेल. अशा स्थितीत जगभरातील अनेक देशांच्या नजराही डेन्मार्कवर लागल्या आहेत. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील गोटेंग प्रांतात 24 नोव्हेंबर रोजी कोरोनाव्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झालेला पहिला रुग्ण समोर आला होता. तर 26 नोव्हेंबरला WHO ने या व्हेरिअंटला व्हेरिअंट ऑफ कंसर्न म्हणून घोषित केले होते.