कोरोना स्थिती गंभीर... इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टर पाहिजे, माजी मुख्यमंत्र्यांचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 11:26 AM2021-04-25T11:26:26+5:302021-04-25T11:26:39+5:30
देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यानं बेड मिळविण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य रुग्णांना सहजासहजी मदत मिळत नाही.
नवी दिल्ली - देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असून रुग्णालये रुग्णांच्या संख्येनं भरली आहेत. दुसरीकडे ऑक्सिजन, रेमेडीसीवीर आणि वैद्यकीय स्टाफची कमतरता जाणवत आहे. या संकटाशी देश धैर्याने सामना करत आहे. मात्र, अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आणि नेतेमंडळी हतबल झाल्याचं पाहायाल मिळत आहे. विशेष म्हणजे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनाही ट्विटरवरुन मदत मागावी लागली, एवढी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यानं बेड मिळविण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य रुग्णांना सहजासहजी मदत मिळत नाही. त्यामुळे, स्थानिक नेतेमंडळींशी संपर्क साधून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. मात्र, नेतेमंडळींनाही मदत शक्य होत नाही. त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपलं ट्विटर अकाऊंट सर्वांसाठी खुलं केलंय. लोकांच्या मदतीसाठीचं ट्विट ते आपल्या अकाऊंटवरुन करत आहेत.
I want to be able to help people through this crisis as best I can because I know what’s it’s like to have a loved one in hospital fighting against COVID. To that end I’ve opened up my DMs for now & will amplify every message requesting/offering help.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) April 25, 2021
या संकटाच्या वेळी मी जितके शक्य होईल तितके मदत करण्यास सक्षम होऊ इच्छित आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीला कोविड विरूद्ध लढा देत असताना काय करावे लागते हे मी जवळून अनुभवलंय. त्यामुळे मी माझ्या ट्वटर अकाऊंटचा इन्बॉक्स उघडला आहे. येथे माझ्याकडे मदतीची विनंती करणाऱ्या युजर्संची हाक मी ट्विटर अकाऊंटवरुन प्रसिद्ध करणार आहे. ज्यामुळे, रुग्णांना मदत मिळण्यास मदत होईल, असे ट्विट ओमर अब्दुला यांनी केलंय. अब्दुल्ला यांच्या या टविटनंतर लगोलग मदतीचे अनेक ट्विट प्रसिद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे ज्या ट्विटला मदत मिळाली त्या ट्विटचे आभारही ओमर अब्दुल्ला यांच्याकडून मानले जात आहेत.
Help received & this request is closed. Thank you SO much. https://t.co/CjGyUsjxLd
— Omar Abdullah (@OmarAbdullah) April 25, 2021
अब्दुल्ला यांच्याकडे मदतीसाठी अनेकांचे मेसेजेस येत आहेत. त्यापैकी, गौर सिटी नोएडा येथील एका युवकाच्या मामांना इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टरची गरज आहे. कोविड पॉझिटीव्ह असलेल्या या रुग्णासाठी डॉक्टर उपलब्ध होतील का? असा प्रश्न अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन विचारला होता. तसेच, संबंधित व्यक्तीचा नंबरही शेअर केला होता. त्यानंतर, काही वेळातच पीडित रुग्णास मदत मिळाली आहे. त्यानंतरही, अब्दुल्ला यांनी मदत मिळाल्याचे कळवत आभार व्यक्त केले आहे.