खुशखबर ! मुंबईसह 12 जिल्ह्यांमध्ये घसरला कोरोनाचा आलेख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 06:23 AM2021-05-04T06:23:10+5:302021-05-04T06:23:50+5:30

महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही नव्या रुग्णांमध्ये घट, निर्बंधांचे परिणाम

Corona's graph slipped in 12 districts, including Mumbai | खुशखबर ! मुंबईसह 12 जिल्ह्यांमध्ये घसरला कोरोनाचा आलेख

खुशखबर ! मुंबईसह 12 जिल्ह्यांमध्ये घसरला कोरोनाचा आलेख

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या संकटामध्ये एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रात नव्या रुग्णांमध्ये घट होत आहे. राज्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, जळगाव सह १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांचा आकडा घटनांना दिसत आहे. महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही केरोना रुग्णांचा आलेख सपाट होत असून या राज्यांमध्ये लवकरच नव्या रुग्णांचा आलेख घटतांना दिसू शकेल, अशी आशा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. 
केंद्रीय आरोग्य विभागाने सह सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी गेल्या पाच आठवड्यांचा आलेख सादर केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या घटतांना दिसत आहे. आलेखानुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, लातूर, नंदूरबार, वाशिम, भंडारा, धुळे आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची नोंद कमी झाल्याचे दिसत आहे. 

नव्या रुग्णांमध्ये घट

राज्याच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेखही सपाट झालेला असून त्यात काही दिवसांपासून मोठी वाढ झालेली नाही. दुसरऱ्या लाटेत महाराष्ट्रात १८ एप्रिलला ६८ हजार ६३१ नवे रुग्ण आढळले होते.  त्यानंतर २ मे रोजी ५६ हजार ६४७ नवे रुग्ण आढळले होते. यावरुन नव्या रुग्णांमध्ये घट होतांना दिसत आहे.

सर्वोच्च बिंदू गाठून घसरण
यापैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये ४ ते १७ एप्रिल या कालावधी रुग्णसंख्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचल्याचे आढळले. त्यानंतर त्यात घट झालेली आहे. 

या राज्यांमध्येही रुग्णसंख्येत घट
nमहाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगढ, पंजाब, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दमण आणि दिव, लक्षद्वीप आणि लडाख या ठिकाणी गेल्या १५ दिवसांमध्ये रुग्णसंख्या घटतांना दिसत आहे.  
nमात्र, ही घट अलीकडेच दिसून आली असून त्याआधारे काही बोलणे घाईचे ठरेल, असे लव अग्रवाल म्हणाले. 
nहे चांगले संकेत असून रुग्णसंख्या घटविण्यासाठी या स्थितीत जिल्हा आणि राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले. 

आपण विचार करायला हवा...

अकोला शहरातील गांधी चौक ते ताजनापेठपर्यंतच्या मार्गावर सोमवारी सकाळी अशी गर्दी उसळली होती. राज्यातील सर्वच शहरांमध्ये रोज सकाळी ११ पर्यंत हीच स्थिती आहे. प्रश्न पडतो, आपल्याला कोरोनाला रोखायचंय की वाढू द्यायचंय? 

 

चिंता कायम : नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरीही १२ राज्यांमध्ये सद्यस्थितीत एक लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्च‍िम बंगाल, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यांमध्ये १ लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. तर सात राज्यांमध्ये सरासरी ५० हजार ते १ लाख सक्रीय रुग्ण आहेत. २२ राज्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर हा १५ टक्क्यांहून अधिक आहे. 

  सरकार  - जनतेला भाजीपाला-अत्यावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी आणखी वेळ देता येईल का? अत्यावश्यक वस्तूंची दुकानांचा वेळ वाढवल्यास गर्दी कमी होईल का? याचा पुनर्विचार करून पाहायला हवा.

  जनता - आवश्यक नसेल तर घराबाहेर पडूच नये. गर्दी असेल त्या ठिकाणी जाणे टाळावे, अन्यथा कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. अत्यावश्यक असेल तर शक्यतो डबल मास्क लावून घराबाहेर पडावे.

 

Read in English

Web Title: Corona's graph slipped in 12 districts, including Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.