देशात कोरोनाचा प्रचंड वेग! तीन दिवसांत 1 लाख रुग्ण; एकूण आकडा 9 लाख पार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 09:48 PM2020-07-13T21:48:21+5:302020-07-13T21:49:45+5:30
देशात 30 जानेवारीला पहिला रुग्ण सापडला होता. यानंतर 110 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी ही संख्या वाढून 1 लाख झाली होती. यानंतर 20 मे पासून लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर हा वेग एवढा वाढला की 15 दिवसांत 2 लाखांचा आकडा पार झाला.
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाने प्रचंड वेग घेतला असून केवळ तीन दिवसांत 1 लाखाचा टप्पा ओलांडल्याने खळबळ उडाली आहे. याबरोबरच आज एकूण आकड्याने 9 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर आजपर्यंत एकूण 5 लाख रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच एकूण कोरोनाबाधितांच्या 62 टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आता अमेरिकेनंतर भारतात दिवसाला सर्वाधिक रुग्ण सापडू लागले आहेत. याआधी अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत होते. अमेरिकेत सध्या सरासरी 40000 कोरोना बाधित दररोज सापडत आहेत. तर भारतात सरासरी 25000 नवे रुग्ण सापडत आहेत.
भारताची आकडेवारी चिंताजनक
देशात 30 जानेवारीला पहिला रुग्ण सापडला होता. यानंतर 110 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी ही संख्या वाढून 1 लाख झाली होती. यानंतर 20 मे पासून लॉकडाऊनमध्ये सूट मिळाल्यानंतर हा वेग एवढा वाढला की 15 दिवसांत 2 लाखांचा आकडा पार झाला. तीन लाख होण्यासाठी 10 दिवस लागले. 4 लाखांवर आकडा जाण्यासाठी 8 दिवस लागले. तर पाच लाखांवर हा आकडा जाण्यासाठी 6 दिवस लागले. एवढेच दिवस 6 व 7 लाखांवर जाण्यासाठी लागले. 7 वरून 8 लाखांवर आकडा जाण्यासाठी 4 दिवस लागले. तर नंतरचा 9 लाखांचा टप्पा ओलांडण्यासाठी केवळ 3 दिवस लागले आहेत.
10 लाख लोकसंख्याचा मागे रुग्ण वाढण्याचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत कमी आहे. भारतात हे प्रमाण 637 रुग्ण आहे. तर 17 जणांचा मृत्यू होत आहे. तर अमेरिकेत 10312 आणि ब्राझीलमध्ये 8,778 रुग्ण वाढत आहेत.
तीन राज्यांतच 58% रुग्ण
महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये कोरोनाने कहर केला आहे. या तीन राज्यांत देशाच्या एकूण आकडेवारीच्या 58 टक्के रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात 29.93%, तामिळनाडूमध्ये 15.86 आणि दिल्लीमध्ये 12.94% रुग्ण सापडले आहेत. जगातील 215 देश आणि बेटांपैकी 202 देश असे आहेत की तिथे महाराष्ट्रापेक्षाही कमी रुग्ण सापडले आहेत. तर केवळ 13 देश असे आहेत जिथे महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
राफेलने तुर्कस्तानच्या हवाई तळावर चढविला हल्ला; अनेक लढाऊ विमाने नष्ट
कमाईची मोठी संधी! Yes Bank निम्म्या दराने शेअर विकणार
Rajasthan Political Crisis: गेहलोत बहुमतात, तरीही आमदार अज्ञातस्थळी? भाजपकडून फ्लोअर टेस्टची मागणी
OnePlus Nord चे फिचर्स लीक; स्वस्त फोनमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि बरेच काही
सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही
शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल
कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे