कोरोनाग्रस्त पतीची किडनी झाली खराब, पत्नी म्हणाली संपत्ती माझ्या नावे करा; मग कोविड वॉर्डात झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 08:42 PM2021-05-14T20:42:55+5:302021-05-14T20:44:17+5:30
Assaulting Case : कोरोनाचीही लागण झाली आहे. नंतर रुग्णाला जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं.
भरतपुरमधील जिल्ह्यातील आरबीएम रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा त्याच्या पत्नीसोबत जोरदार भांडण झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अद्याप या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ तीन दिवस जुना आहे. मिळालेल्या माहितीनुसार धानोता गावातील रहिवाशी रुपकिशोरची किडनी निकामी झाली असून दरम्यानच त्याला कोरोनाचीही लागण झाली आहे. नंतर रुग्णाला जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं.
कुटुंबाकडून आजारी व्यक्तीच्या पत्नीला किडनी दान करण्याची विनंती केली जात होती. पत्नीने मात्र किडणी देण्यास नकार दिला. रुपकिशोर म्हणजेच तिचा पती सर्व संपत्ती तिच्या नावावर करेल तेव्हा ती किडणी देण्यास तयार होईल, असा सौदा तिने केला. यावरूनच घरचा वाद चव्हाट्यावर आला आणि कोविड वॉर्डात हाणामारीचा प्रकार घडला.
संपत्ती नावावर करण्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून पत्नी आणि कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होते. वादाचे रूपांतर वॉर्डात मारहाणीत झाले. एकमेकांवर पंखा उचलून हल्ला केला. त्यानंतर कोविड वॉर्डातील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिल्हा रुग्णालयाचे पीएमओ डॉ. जिज्ञासा साहनी यांनी सांगितलं की, वॉर्डच्या आत रुग्णाचे नातेवाईक घुसले होते. ज्यात रुग्णालय स्टाफला देखील मारहाण करण्यात आली. त्या पुढे म्हणाल्या की, यात वॉर्डच्या बाहेर तैनात सुरक्षा रक्षकांचीही चूक आहे. त्यांनी कुटुंबीयांना आत येण्यास परवानगी दिली.