CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 02:46 PM2020-08-07T14:46:09+5:302020-08-07T16:42:48+5:30
भारतासह इतर देशांमधील गरीबांना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी सीरम इंस्टीट्युट आणि बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यात करार झाला आहे.
नवी दिल्ली/वॉशिंग्टन - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण जग वेठीस धरले गेले आहे. त्यामुळे कोरोनाचे हे संकट नियंत्रणात यावे यासाठी लस विकसित करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोरोनावरील लस विकसित झाल्यानंतर ती गरीबांना उपलब्ध व्हावी यासाठी बिल गेट्स आणि भारतातील सीरम इंस्टीट्युट यांनी पुढाकार घेतला आहे. भारतासह इतर देशांमधील गरीबांना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी सीरम इंस्टीट्युट आणि बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यात करार झाला आहे. या करारानुसार गरीबांसाठी कोरोनावरील दहा कोटी लस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
भारतातील सीरम इंस्टीट्युट ही जगामधील आघाडीच्या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. दरम्यान,
कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या अॉक्सफर्ड विद्यापीठानेसुद्धा कोरोनावरील लसीचे उत्पादन करण्यासाठी सीरम इंस्टीट्युटसोबत करार केला आहे. अॉक्सफर्डकडून विकसित करण्यात येत असलेल्या या लसीबाबत जगाला खूप अपेक्षा आहेत. तसेच सीरम इंस्टीट्युटच्या पुनावाला यांनीही लसीचे उत्पादन झाल्यानंतर भारतीयांना ही लस माफक दरात उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले होते.
Serum Institute of India (SII) enters into a new landmark partnership with Gavi, The Vaccine Alliance and the Bill & Melinda Gates Foundation, to accelerate the manufacture and delivery of up to 100 million doses of #COVID19 vaccines for India and low & income countries: SII pic.twitter.com/U8PIOIyj0w
— ANI (@ANI) August 7, 2020
दरम्यान, जगातील दानशूर व्यक्तींमध्ये समावेश असलेल्या बिल गेट्स यांनीही आपल्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्यावतीने कोरोनाविरोधातील लढाईत गोरगरीबांना लस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. बिल गेट्स यांच्या या संस्थेने सीरम इंस्टीट्युटसोबत कोरोनावरील लसीसाठी मोठा करार केला असून, या करारामुळे गरीबांना कोरोनावरील लस उपलब्ध होणे शक्य होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी