CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 06:31 PM2020-08-23T18:31:51+5:302020-08-23T18:42:01+5:30
भारत तब्बल 17 सेंटर्सवर 1600 लोकांवर हे परीक्षण 22 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. प्रत्येक सेंटरवर जवळपास 100 स्वयंसेवक आहेत.
मुंबई/नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरस लशींच्या शर्यतीत सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सर्वात पुढे आहे. सीरम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने डेव्हलप केलेल्या लशीचे परीक्षण आणि उत्पादन करणार आहे. या कंपनीला सरकारने लशीच्या उत्पादनाची मंजुरी दिली आहे. काही वृत्तांत म्हणण्यात आले होते, की SII ची लस COVISHIELD 73 दिवसांच्या आत बाजारात उपलब्ध होईल. मात्र, कंपनीचे म्हणणे आहे, की हा केवळ एक अंदाज आहे. ही लस परीक्षण यशस्वी झाल्यानंतर आणि रेग्यूलेटरी अप्रूव्हल मिळाल्यानंतरच बाजारात येईल.
स्वतःच सांगू, केव्हा येणार लस -
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या एका निवेदवात म्हटले आहे, की "सरकारने सध्या आम्हाला केवळ भविष्यात वापरासाठी लशीचे उत्पादन आणि साठवण करण्याची परवानगी दिली आहे." कंपनीने स्पष्ट केले आहे, की जेव्हा परीक्षण यशस्वी होईल आणि रेग्युलेटरी अप्रूव्हल मिळेल तेव्हाच COVISHIELD बाजारात येईल. ऑक्सफर्ड-अस्ट्राजेनेकाच्या लशीचे तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरू आहे. एकदा ही लस प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यास ते स्वतःच तिच्या उपलब्धतेसंदर्भात सांगतील. कंपनीची लस निम्न आणि मध्यम उत्पन्न गटांतील देशांत केवळ 3 डॉलर, म्हणजेच साधारणपणे 225 रुपयांना उपलब्ध होईल.
भारतात 17 ठिकाणी सुरू आहे ट्रायल -
'नेचर' जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, माकडांवर ही लस पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. माकडांत कोविड-19 विरोधात इम्यूनिटी डेव्हलप झाली आहे. मानवावरील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षण पूर्ण झाले आहे. भारत, ब्राझील सह जगातील अनेक देशांत तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण सुरू आहे. भारत तब्बल 17 सेंटर्सवर 1600 लोकांवर हे परीक्षण 22 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. प्रत्येक सेंटरवर जवळपास 100 स्वयंसेवक आहेत. नोव्हेंबरपर्यंत हे परिक्षण पूर्ण होण्याची आशा आहे. याचा निकाल चांगला आला, तर रेग्युलेटरी अप्रूव्हलनंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून लशीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हायरला सुरूवात होऊ शकते.
ऑक्सफर्ड लशीची बुकींग -
जगभरातील देशांचा ऑक्सफर्डची लस विकत घेण्याकडे ओढा आहे. यूनायटेड किंगडमने 100 मिलियन डोसची डील केली आहे. ब्राझील सरकारनेही 127 मिलियन डॉलरमध्ये 30 मिलियन डोसचा सौदा केला आहे. याशिवाय यूरोपियन यूनियनमधील अनेक देश सध्या सौदा करण्याच्या प्रक्रियेत आहेत. ऑक्सफर्डने म्हटले आहे, की यूकेमध्ये ही लस स्वस्तात उपलब्ध होईल.
महत्त्वाच्या बातम्या -
ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात
अमेरिकेच्या निवडणुकीत भारताचे पंतप्रधान, ट्रम्प यांच्या प्रचार व्हिडिओत मोदींचा समावेश
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!
CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!
CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!