coronavaris : १ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 09:17 AM2020-03-31T09:17:14+5:302020-03-31T09:17:53+5:30
coronavaris : १ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच
मुंबई - कोरोना लॉकडाऊनच्या काळात समाजसेवक अन् मदतीनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येतंय. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन स्वयंस्फूर्तीने हे समाजसेवक आपल्या दानशूर व्यक्तीत्वाचा बडेजावपणा सांगताना दिसत आहेत. एखाद्या गरिबाला थोडसं अन्न द्यायचं अन् १० जणांनी एकत्र येऊन फोटो काढायचा, जणू आता या गरिबाचा सगळा खर्च तेच करणार आहेत. विजेंदरने अशा समाजसेवा करणाऱ्यांना चांगलीच चपराक लगावली आहे. एका शायरीच्या माध्यमातून विजेंदरने अशा स्वयंस्फूर्ती समाजसेवकांवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर किराणा दुकाना आणि अत्यावश्यक सेवेच्या मालासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. मात्र, गरिब आणि मजदूर वर्गाची मोठी उपासमार या काळात होताना दिसून आली. या परिस्थितीत अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेत गरिबांना मदतीचा हात दिला. मात्र, या परिस्थितीत तोडकीशी मदत करत, फोटोसेशन आणि भंकपणाही होताना दिसून येत आहे. सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात हा दिखाऊपणा दिसून येतो. अनेकांनी केवळ पब्लिसिटी स्टंटसाठीच या मदतीचा उपयोग केला की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. नेहमीच आपले मत स्पष्टपणे मांडणाऱ्या बॉक्सर विजेंदर सिंगने शायरीतून यावर प्रकाश टाकलाय. विजेंदर सिंगच्या या शायरीवर काँग्रेस नेते माजी आमदार मुकेश शर्मा यांनीही समर्थनार्थ दोन ओळी लिहिल्या आहेत.
ग़रीबी की क्या ख़ूब हँसी उड़ाई जा रही है,
— Vijender Singh (@boxervijender) March 30, 2020
1 रोटी देकर 100 तस्वीर खिंचाई जा रही है ।
ग़रीबी की क्या ख़ूब हँसी उड़ाई जा रही है,
1 रोटी देकर 100 तस्वीर खिंचाई जा रही है ।
बॉक्सर विजेंदर सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंटवरु विचार करण्यासारखा विचार मांडला आहे. हजारो युजर्संने विजेंदरचं हे ट्विट रिट्विट करत, हे म्हणणं अतिशय बरोबर असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अनेकांनी हा भाजपा समर्थकांना टोला असल्याचे समजून विजेंदरलाही तूझं तूझं काम करावं, असा सल्ला दिलाय. पण, बहुतांश युजर्संना त्याचं हे ट्विट आवडल्याचं दिसून येतंय.
तथाकथित नेता व समाज सेवक गरीबों को जलील करना बंद करें!@boxervijender आपने सच लिखा है https://t.co/7zxt3GJObv
— Mukesh Sharma (@MukeshSharmaMLA) March 30, 2020
तथाकथित नेता व समाज सेवक गरीबों को जलील करना बंद करें! असे म्हणत मुकेश शर्मा यांनी विजेंदरने अगदी सत्य लिहिल्याचं म्हटलंय.
‘लॉकडाऊन’चे बºयापैकी पालन होत असतानाच विविध राज्यांमधून हजारो स्थलांतरित कामगारांचे तांडे घराकडे परतत असल्याच्या बातम्यांनी देशभर गहजब झाला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून, या कठोर पावलामुळे जनतेला सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टांबद्दल क्षमायाचना केली होती. काही दिवसांसाठी सर्वांना कळ सोसावीच लागेल, ‘लॉकडाऊन’ पाळला नाही, तर या धोक्यापासून देशाला वाचविणे कठीण होऊन बसेल.