coronavirus: रेशन कार्ड असो वा नसो धान्य मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 07:22 AM2020-05-15T07:22:48+5:302020-05-15T07:23:04+5:30
स्थलांतरितांना दोन महिने देणार मोफत धान्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. या योजनेमुळे देशभरातील ८ कोटी स्थलांतरितांना लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या खर्चातील मोठा भार केंद्र सरकार उचलणार असला तरी अंमलबजावणी राज्यांना करायची आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झालेल्या मजुरांना केंद्र सरकारने मदतीचा हात दिला आहे. या मजुरांकडे रेशन कार्ड असो वा नसो त्यांना येते दोन महिने ५ किलोे तांदुळ अथवा गहू आणि एक किलो चणा मोफत देण्यात येणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. या योजनेमुळे देशभरातील ८ कोटी स्थलांतरितांना लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या खर्चातील मोठा भार केंद्र सरकार उचलणार असला तरी अंमलबजावणी राज्यांना करायची आहे.
स्थलातरितांकडे केंद्र अथवा राज्य सरकारचे रेशन कार्ड असो वा नसो त्यांना येते दोन महिने पाच किलो धान्य आणि एक किलो चणा मोफत दिले जाणार आहे. यासाठी ३५०० कोटी रुपयांचा खर्च येण्याची अपेक्षा असून हा सर्व खर्च केंद्र सरकार सोसणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारांवर राहील.
प्रधानमंत्री गरीब अन्न योजना आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत शिधापत्रिका धारकांना दरमहा देण्यात येत असलेले प्रत्येक व्यक्तीसाठी पाच किलो धान्य आणि कुटुंबासाठी एक किलो डाळ ही येत्या जून महिन्यापर्यंत देण्यात येईल