Coronavirus : धोका वाढला! देशातील 'या' 10 जिल्ह्यांत कोरोनाचा कहर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 10:32 AM2020-04-20T10:32:26+5:302020-04-20T10:44:11+5:30
Coronavirus : देशातील 732 जिल्ह्यांमधील 406 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कमीत कमी एक रुग्ण समोर आला आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 16,000 हून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर मोदी यांनी देशभरात 3 मेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.
देशातील 170 जिल्ह्यांना कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तर यामधील 10 जिल्हे कोरोना संक्रमणामुळे सर्वाधिक प्रभावित झाले असून येथे कोरोनाने कहर केला आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी 46.39 टक्के रुग्ण या भागातील आहेत. तसेच या जिल्ह्यांतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 6,540 असल्याची माहिती मिळत आहे. देशातील 732 जिल्ह्यांमधील 406 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कमीत कमी एक रुग्ण समोर आला आहे. यानुसार 55.46 जिल्हांमध्ये कोरोना प्रभाव आहे. ही संख्या 23 मार्च रोजी 84 होती 9 एप्रिल रोजी ती 284 पर्यंत पोहोचली आहे आणि आता 406 इतकी झाली आहे. 406 मधील 170 जिल्हे हॉटस्पॉट आहेत. 170 मधील 123 जिल्ह्यांमध्ये 15 हून अधिक संख्या समोर आली आहे.
18 एप्रिलपर्यंत 10 कोरोना हॉटस्पॉट जिल्हे
1. मुंबई - 2079
2. इंदूर- 842
3. नवी दिल्ली- 802
4. अहमदाबाद- 590
5. पुणे- 496
6. जयपूर- 489
7. हैद्राबाद- 407
8. दक्षिण दिल्ली- 320
9. ठाणे- 293
10. चेन्नई- 222
Coronavirus : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्याला पोलिसांनी दिली अनोखी शिक्षा, Video पाहून कराल कौतुकhttps://t.co/MXBDlj3clW#CoronaUpdatesInIndia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 20, 2020
देशभरात 20 जिल्हे असेही आहेत जेथे 100 हून अधिक कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत. देशात एकूण कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणात या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या 50 टक्के इतकी आहे. यासह एकूण मृत्यूंमध्ये या 20 जिल्ह्यांतील रुग्णसंख्या 67 टक्क्यांएवढी आहे. यामध्ये दक्षिण दिल्ली, नवी दिल्ली, मध्य दिल्ली, आग्रा, जयपूर, जोधपूर, भोपाळ, अहमदाबाद, वडोदरा, इंदूर, ठाणे, मुंबई, पुणे, कासरगोड, हैदराबाद, चेन्नई, कुरनूल, गुंटूर, कोयम्बतूर आणि कोलकाता यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
16 राज्यांतील हॉटस्पॉट जिल्हे
1. तमिळनाडू (22 जिल्हे)
2. महाराष्ट्र (14)
3. उत्तर प्रदेश (13)
4. राजस्थान (12)
5. आंध्र प्रदेश (11)
6. दिल्ली (10)
7) तेलंगणा (9)
8. जम्मू आणि काश्मीर (8)
9. पंजाब (8)
10. कर्नाटक (8)
11. केरळ (7)
12. मध्य प्रदेश (6)
13. हरियाणा (6)
14. गुजरात (6)
15. आसाम (5)
16. हिमाचल प्रदेश (5)
Coronavirus : कोरोनाची लक्षणे असलेल्या पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं, पत्नीने घरीच केले उपचार अन्...https://t.co/Xzc0FUKwNK#CoronaLockdown#CoronaUpdatesInIndia
— Lokmat (@MiLOKMAT) April 20, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्याला पोलिसांनी दिली अनोखी शिक्षा, Video पाहून कराल कौतुक
Coronavirus : कोरोनाची लक्षणे असलेल्या पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं, पत्नीने घरीच केले उपचार अन्...
CoronaVirus: आजपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल; थोडी सूट, काही निर्बंध
CoronaVirus: ग्रीन, ऑरेंज झोनमधील नागरिकांना आजपासून दिलासा; जाणून घ्या काय बंद, काय सुरू