Coronavirus : चिंताजनक! देशात 24 तासांत 1,336 नवे रुग्ण, 47 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 10:18 AM2020-04-21T10:18:39+5:302020-04-21T10:26:33+5:30
Coronavirus : कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत.
नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाची रुग्ण संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस वाढले आहेत. 19 एप्रिलच्या आकडेवारीनुसार देशात सरासरी 7.5 दिवसांमध्ये ही संख्या दुप्पट होत आहे. तत्पूर्वी त्यासाठी केवळ 3 दिवस लागत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी दिली होती. मात्र त्यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरात गेल्या 24 तासांत 47 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 336 नवे रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 18 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 47 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 1 हजार 336 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 18 हजार 601 वर पोहचली आहे. तर 590 जणांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 759 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 3252 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे.
47 deaths and 1336 new cases reported in last 24 hours. India's total number of #Coronavirus positive cases rises to 18,601 (including 14759 active cases, 3252 cured/discharged/migrated and 590 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/ZYumpbPvna
— ANI (@ANI) April 21, 2020
गोव्यात मार्चपासून एकही नवा रुग्ण आढळला नाही. 23 राज्यांमधील 59 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नसल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. 18 जिल्ह्यांमध्य हा वेग 8 ते 15 दिवसांवर गेला आहे तर काही राज्यांमध्ये 20 दिवस लागतात. महत्त्वाचे म्हणजे ओडिशा व केरळमध्ये 30 दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट झाल्याने आरोग्य मंत्रालयास मोठा दिलासा मिळाला आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 24 लाख 30 हजारांवर गेली असली तरी त्यापैकी सुमारे 6 लाख 38 हजार रुग्ण बरेही झाले आहेत. मात्र या संसर्गजन्य आजाराने 1 लाख 66 हजार जणांचा बळीही घेतला आहे.
Coronavirus : ...अन् रुग्णाची प्रकृती सुधारली, कोरोनाच्या उपचारात 'ही' थेरपी आशेचा किरण ठरलीhttps://t.co/y315r66fu5#coronavirusinindia#CoronaUpdatesInIndia
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2020
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. याच दरम्यान एक दिलासादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्ताच्या प्रकृतीत एका थेरपीमुळे सुधारणा झाल्याची घटना घडली आहे. एका 49 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. यामध्ये त्या रुग्णाची प्रकृती सुधारली असून त्याचे दोन रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णाची चाचणी घेतल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. तेव्हापासूनच त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात या रुग्णाला प्लाझ्मा थेरपी दिली गेली. या थेरपीनंतर आता रुग्णाच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे.
Coronavirus : 'माझ्या वडिलांना वाचवा'... लेकीची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विनवणी; Video पाहून व्हाल भावूकhttps://t.co/G9mY7GQ8hk#coronavirusinindia#CoronaUpdates#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ...अन् रुग्णाची प्रकृती सुधारली, कोरोनाच्या उपचारात 'ही' थेरपी आशेचा किरण ठरली
CoronaVirus: दिलासादायक; कोरोना संसर्गाचा वेग मंदावला; रुग्ण दुपटीचा कालावधी ७ दिवसांवर
CoronaVirus: राज्यात कोरोनाचा वाढला प्रकोप; एकट्या मुंबईत तीन हजारहून अधिक रुग्ण