coronavirus: परदेशात अडकलेल्या १४ हजार भारतीयांना ६४ विमानांमधून परत आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 04:55 PM2020-05-05T16:55:52+5:302020-05-05T17:03:18+5:30
कोरोनामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त परदेशात स्थायिक झालेले लाखो भारतीय नागरिक विदेशात अडकून पडले आहेत.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण जगात आरोग्य आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त परदेशात स्थायिक झालेले लाखो भारतीय नागरिक विदेशात अडकून पडले आहेत. दरम्यान, परदेशात अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पुढच्या आठवड्यात तब्बल ६४ विमानांमधून परदेशात अडकलेल्या १४ हजार ८०० भारतीयांना परत आणले जाणार आहे.
या मोहिमेची सुरुवात बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत अमेरिका, कुवेत, फिलिपिन्स, बांगलादेश, सौदी अरेबिया, मलेशिया आणि संयुत्च अरब अमिरातीसाठी विशेष उड्डाणे होणार आहेत. यापैकी अनेक उड्डाणे एअर इंडियाच्या नेतृत्वात केली जातील. तसेच एका विमानात २०० ते ३०० प्रवाशांना बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.
परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणण्याच्या मोहिमेंतर्गत पहिल्या दिवशी १० विमानांमधून २ हजार ३०० लोकांना परत आणले जाईल. भारतातून निघालेली ही विमाने अमेरिका, फिलिपिन्स, सिंगापूर, बांगलादेश, यूएई, ब्रिटन, सौदी अरेबिया, कतार, ओमान, बहरीन आणि कुवेतसारख्या देशामधून लोकांना घेऊन येतील.
महत्त्वाच्या बातम्या
बाळासाहेब, इंदिरा, पवार, लालूप्रसाद... राज ठाकरेंनी शेअर केली स्वतः काढलेली दुर्मिळ अर्कचित्रं
coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह
CoronaVirus: मुलीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांतच ती झाली कर्तव्यावर हजर
दुसऱ्या दिवशी सुमारे २ हजार ५० भारतीयांना नऊ विविध देशांमधून चेन्नई, कोची, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू आणि दिल्ली येथे आणले जाईल. त्यानंचर पुढच्या दिवशी अमेरिका, मध्यपूर्व देश, युरोप आणि दक्षिण पूर्व आशियामधील १३ देशातून दोन हजारांहून अधिक लोकांना मुंबई, कोची ,लखनौ आणि दिल्ली येथे आणले जाईल.
दरम्यान, कोरोनाची लक्षणे दिसत नसलेल्याच लोकांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच नौदलाने आखाती देशात अडकलेल्या १० हजार भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलाकडून तीन युद्धनौका पाठवल्या जाण्याची शक्यता आहे.