CoronaVirus News: देशात एकाच दिवसात कोरोनाचे २००३ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 04:03 AM2020-06-18T04:03:44+5:302020-06-18T04:04:03+5:30
११ हजार नवे रुग्ण; रुग्णसंख्या साडेतीन लाखांवर
नवी दिल्ली : देशभरामध्ये मंगळवारी कोरोनाच्या संसर्गामुळे २००३ जणांच्या मृत्यूची नोंद झालाी. त्यामुळे बळींची संख्या ११ हजारांहून अधिक झाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने एका दिवसात याआधी बळी गेले नव्हते. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येने देशात साडेतीन लाखांचा आकडा पार केला.
देशात मंगळवारी कोरोनाचे १० हजार ९७४ नवे रुग्ण आढळून आले अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली. या साथीमुळे मरण पावलेल्या २००३ लोकांमध्ये महाराष्ट्रातील बळींची संख्या १४०९ इतकी आहे. दिल्लीमध्येही कोरोनाचे थैमान कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्या शहरात मंगळवारी या आजारामुळे ४३७ जणांचा मृत्यू झाला असून बळींची संख्या १८००पेक्षा अधिक झाली आहे.
तमिळनाडूच्या चेन्नई आणि अन्य तीन जिल्ह्यांमध्ये संसर्ग वाढल्याने पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत. दिल्ली व गुजरात या राज्यांमध्येही कोरोनाचे ४0 हजारांहून अधिक रुग्ण आहेत. गुजरातमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.
सध्या देशामध्ये १,५५,२२७ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर १ लाख ८६ हजार ९३४ रुग्ण घरी परतले आहेत. कोरोना साथीमुळे आजारी पडणाऱ्यांपेक्षा बरे होऊन जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.